Big Breaking : आताची सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या पत्नी रूग्णालयात दाखल
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून मुंबईमधील ब्रीच क्रँडी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे. शरद पवारही रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती समजत आहे.
Maharashtra | NCP chief Sharad Pawar's wife Pratibha Pawar admitted to Mumbai's Breach Candy Hospital: She will undergo surgery at Breach Candy Hospital, NCP President Sharad Pawar has reached the hospital: NCP
— ANI (@ANI) July 14, 2023
प्रतिभा पवार यांच्यावर कोणती शस्त्रक्रिया होत आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शरद पवार यांनी पहिल्यांदा राष्ट्रावादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं होतं तेव्हा शरद पवारांसोबत त्या हॉलमध्ये प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. मात्र त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली.
अजित पवारांची निवड न झाल्याने ते नाराज होते आणि त्यांनी बंड करत राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत शिंदे-फडणवीसांसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मुंबईमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं त्यावळी सर्वाधिक आमदार अजित पवारांसोबत असल्याचं दिसून आलं.
राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार यांनी दावा केला आहे मात्र शरद पवार यांनी त्यांना आपला पाठिंबा नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट ज्या प्रकारे कोर्टात कायदेशीर लढाई लढत आहेत त्याप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन्ही गट दिसणार का हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीतील शपथ घेतलेल्या 9 आमदारांना खाती देण्यात आली आहेत. अजित पवार – अर्थ, नियोजन, छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, धर्मरावबाबा अत्राम- औषध व प्रशासन, दिलीप वळसे पाटील – सहकार, धनंजय मुंडे – कृषी, हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण, अनिल पाटील – मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण आणि संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे