AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain | टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट ! महाराष्ट्रात कोण-कोणत्या जिल्ह्यात पावसाचं थैमान?

चंद्रपूरसह राज्यभरात पावसाची कमीअधिक हजेरी पाहायला मिळाली. नांदेड, अमरावती, गडचिरोली, यवतमाळसह अनेक भागात दमदार पाऊस झाला. कुठे कुठे किती पाऊस झाला आणि काय चित्र निर्माण झालं याची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट!

Maharashtra Rain | टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट ! महाराष्ट्रात कोण-कोणत्या जिल्ह्यात पावसाचं थैमान?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 11:07 PM

मुंबई | 28 जुलै 2023 : महाराष्ट्रात सध्या प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे आज चंद्रपूर शहरात महापूर आला. या पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तसेच वाहतुकीवर देखील मोठा परिणाम पडला. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, अकोला, नांदेड, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. दरम्यान, राज्यभरात आज दिवसभरात नेमका कुठे-कुठे पाऊस पडला आणि त्याचा काय परिणाम पडला याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

नांदेडमध्ये रुग्णालयात जाणाऱ्या महिला गावातच अडकल्या

नांदेडमधील मुदखेड तालुक्यातील पाथरड गावाचा संपर्क तुटलाय. गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक बंद आहे. पाथरड गावात जाणाऱ्या अंडरपास ब्रिजखाली 12 ते 15 फूट पाणी साचलंय. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णालयात जाणाऱ्या महिला गावातच अडकल्या आहेत.

गावातून शहरात जाण्यासाठी गावकऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागतेय. मुसळधार पावसानं शेतपिकांचंही मोठं नुकसान झालंय. ऊसासह सोयाबीन, उडीद हातातून गेल्यानं शेतकरी हवालदील झालाय.

अमरावती जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस

धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झालाय. पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतात पाणी साचल्यानं पिकांचं, तर अनेक घरात पाणी शिरल्यानं घरातील वस्तूंचंही मोठं नुकसान झालाय. धामणगावमध्ये अडकून पडलेल्या लोकांना मानवी साखळी करुन बाहेर काढण्यात आलं. आज दिवसभर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड शिवारात शेतकऱ्यांवर जीव धोक्यात घालून नाल्यातून प्रवास करण्याची वेळ. खारवगळ नाल्यावर पूल उभा करण्याची मागणी अजूनही मान्य नाही. त्यामुळं अनेकवेळा जीव धोक्यात घालून वाट काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली.

पालघरमध्ये सूर्या नदीला मोठा पूर

पालघरच्या सूर्या प्रकल्पातील सर्वात मोठी पाणी क्षमता असलेल्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले. धामणी आणि कवडास मिळून 1 हजार 940 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आलाय. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आलाय. सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पालघरमध्येच एका शाळेतून घरी निघालेली दोन मुलं नदीत अडकली होती. गावकऱ्यांनी या मुलांना सुखरुपपणे बाहेर काढलं.

दरम्यान, वसईच्या तुंगारेश्वर जंगलातील नदीत एक फॉर्च्युनर कार वाहून जाण्यापासून थोडक्यात वाचली. मंदिरात दर्शनासाठी जाताना नदी पात्रातून वाट काढावी लागते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं कार वाहून जाऊ लागली. मात्र बाजूला बंधाऱ्याची भिंत असल्यानं कार वाचली. गुरुवार संध्याकाळचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

गडचिरोली जिल्ह्यात प्राणहिता गोदावरी नदीला पूर

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सध्या प्राणहिता गोदावरी नदीला मोठा पूर आलाय. धोका टाळण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील 15 गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहेत.

रायगडला ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याकडून रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. आज पावसानं काही काळ विश्रांती घेतली असली तरी काही भागात रिमझीम पाऊस बरसतोय. सध्या जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी स्थिर आहे. मात्र, ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील निसर्गसौंदर्यात अजूनच भर

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरु असल्यानं जुन्नर तालुक्यातील निसर्गसौंदर्यात अजूनच भर पडलीय. छोटे-मोठे धबधबे ओसंडून वाहू लागलेत. विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलंही जुन्नरच्या दिशेनं वळत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात रात्री नद्यांना आलेला पूर ओसरला

संग्रामपूर तालुक्यात रात्री नद्यांना आलेला पूर ओसरला आहे. रात्री सातपुड्यात झालेल्या पावसामुळं अनेक गावात पुराचं पाणी शिरलं होतं .

नागपूर जिल्ह्यात विहीरगावला पुराच्या पाण्याचा वेढा

नागपूर जिल्ह्यातील विहीरगावला पुराच्या पाण्याचा वेढा आहे. गावातील नाल्याला पूर आला. तर बहादुरा ते विहिरगाव पुलावर पाणी आल्यानं वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यात नदीवरील पूल वाहून गेला

यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं वर्धा नदीला पूर आला. वणी परिसरात अनेक गावं प्रभावित झाली. वर्धा नदीचं रौद्ररुप पाहण्यासाठी वणीच्या पाटाळा पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील उमरी कापेश्वर जवळच्या पैनगंगा नदीवरील पूल वाहून गेला. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. सध्या तात्पुरता रस्ता तयार करण्याचं काम सुरु

रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख कोंढरणमध्ये भूस्खलन

रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख कोंढरणमध्ये भूस्खलन झालं. कोंढरण गावातील 50 घरांमधील 80 जणांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं. एका घरावरही दरड कोसळली, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दरड कोसळल्यानं घरांना भेगा पडल्या. संबंधित घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....