मुंबई, नवी मुंबई ढगाळ! कोकण, गोवा मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, उद्या विदर्भातही बरसणार?

Asani Cyclone Weather Update : मुंबईत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमान वाढलंय. तर दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे.

मुंबई, नवी मुंबई ढगाळ! कोकण, गोवा मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, उद्या विदर्भातही बरसणार?
आज पाऊस येणार?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 8:50 AM

मुंबई : आजपासून पुढचे तीन दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता (Maharashtra Rain Update) आहे. यामुळे वाढलेल्या तापमानापासून दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आजपासून 13 मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस (Rain Expected) होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे लोक अधिकच घामाघूम झाले आहेत. वाढलेल्या तापमानाचा फटका सगळ्यांना बसतोय. अशातच विदर्भात उष्णतेची लाट (Heat Wave) येईल असा इशारा हवामान विभागानं आधीच दिलेला होता. आज उद्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहनंही केलं जातंय. तर दुसरीकडे गोव्यासह कोकण किनारपट्टी आणि मुंबईतही वातावरण कोरडं होतं. आज कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

  1. 11 मे – कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज, तर उत्तर मध्य महाराष्ट्रासबह विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
  2. 12 मे – कोकण, गोव्यासह विदर्भातही अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट कामय राहण्याचा अंदाज
  3. 13 मे – कोकणतील बहुतांश भागात पावसाची शक्यता

मुंबई ढगाळ

मुंबईत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमान वाढलंय. तर दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर हवामान विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून असानी चक्रीवादळाबाबत अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण पहायला मिळतंय. त्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पाहा हवामान तज्ज्ञांनी काय म्हटलं?

असानीचा काय परिणाम?

दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असानी चक्रीवादळामुळे यंत्रणाही सतर्क आहेत. या वादळाचा महाराष्ट्राला फटका बसण्याची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. मात्र या वादळामुळे बंगालच्या बहुतांश भागात वेगानं वारे वाहून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर बंगालमध्ये या वादळाचे परिणाम जाणवतील, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसंच महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं वर्तवली जातेय.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.