राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी, ‘या’ भागात अवकाळी पावसाचा अंदाज
पुढील तीन-चार दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra rainfall forecast Light showers in many places)
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावले. मुंबई, पुणे, औरंगाबाद, चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पाहायला मिळाला. हवेच्या दिशेतील बदलामुळे तसेच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अवकाळी पाऊस झाल्याचे स्पष्टीकरण हवामान खात्याने दिलं आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra rainfall forecast Light showers in many places)
मुंबईत पावसाच्या सरी
मुंबईत माहिम, प्रभादेवी, सायन, अॅण्टॉप हिलसोबतच घाटकोपर, सांताक्रुझ, वांद्रे या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला. मुंबईत काल दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.
१० एप्रिल, 8.45 am अजून पुण्यात सूर्य दर्शन नाही… ढगाळ ☁☁आकाश व गडगडाट ??पहाटे पासून सुरू. काही ठीकाणी पाउसही?? Watch for change in weather; can have some effect on health too. Sat/Sun Pune fully locked down,so not to go out otherwise and weatherwise too. Enjoy from Home. pic.twitter.com/DM7GfIGzB2
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 11, 2021
पुण्यात पावसाच्या हलक्या सरी
तर पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. पुण्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच येत्या चार दिवसात पुण्यात जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेने वर्तवला आहे.
औरंगाबादेत ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या काही परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. या ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा पाहायला मिळत आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी पिकं आणि फळपिकांना धोका निर्माण झाला आहे.
चंद्रपुरात मुसळधार पावसाची हजेरी
तसेच मुसळधार पावसाने चंद्रपूरला झोडपले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने चंद्रपुरात हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील काही भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे पावसामुळे अल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच चंद्रपुरात आज सकाळपासून सूर्यदर्शन पाहायला मिळत नाही.
‘या’ भागात अवकाळी पावसाचा अंदाज
मुंबई, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची अंदाज आहे.
- रविवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ
- सोमवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ
- मंगळवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ
- बुधवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ
(Maharashtra rainfall forecast Light showers in many places)
संबंधित बातम्या :
Maharashtra Needs Vaccine : पुणे, सातारा, सांगली, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांचं शटर डाऊन!
रुग्णालयात जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स मिळत नाही, मग ‘या’ नंबर ‘वर कॉल करा