St Workers Protest LIVE Updates : संप सुरूच, कामगारांची आजची रात्रंही आझाद मैदानात, उद्या घेणार निर्णय; सदाभाऊ खोत यांची माहिती
Anil Parab Press Conference on ST Bus Workers Strike LIVE : परिवहन मंत्री आणि एसटी कर्मचारी शिष्मंडळामध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. त्यानंतर अजित पवारांच्या भेटीनंतर पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सायंकाळी 6 वाजता अनिल परब पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार आहेत.
मुंबई : गेल्या 17 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. हा संप मिटावा म्हणून आज दिवसभरापासून जोर बैठका सुरू आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कामगारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा केली. नंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. अनिल परब यांची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. पत्रकार परिषदेत एसटीच्या संपाबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात येत आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
एस टी आंदोलनात फुट ?
पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना सोडून आता गुनरत्न सदावर्ते यांच्याकडे आंदोलनाच नेतृत्व ?
सदावर्ते आझाद मैदानावर येताच जोरदार घोषणाबाजी,
विलीनीकरणाशिवाय माघार नाही – गुणरत्न सदावर्ते
तर कर्मचार्यांशी चर्चा करून निर्णय घेणार – पडळकर आणि खोत यांची भुमिका
आझाद मैदानावर दोन वेगवेगळे गट तयार व्हायला सुरूवात
-
सदाभाऊ खोत
चर्चा करुन संपासंदर्भात उद्या निर्णय जाहीर करणार
आज कर्मचाऱ्यांचा मुक्काम आझाद मैदानावर
-
-
अहमदनगर
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पत्रकार परिषदे नंतर देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम
सरकारच्या निर्णयावर कर्मचाऱ्यांच समाधान नाहीच
Tv9 च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी पाहिली live पत्रकार परिषद
परबांच्या पगार वाडीच्या निर्णया नंतर देखील st कर्मचारी संपावर ठाम
जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे नाही
-
ठाणे
विलिनीकरणाच्या मागणीवर ठाणे एस टी कामगार ठाम
बैठकीत काही निर्णय झाला तरी विलीनीकरणाची मागणी महत्त्वाची असल्याने संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका
ठाणे खोपट एस टी डेपोत कर्मचाऱ्यांची काळी फीत बांधून जोरदार घोषणाबाजी
ठाणे एसटी कामगारांचा संपचा 18 वा दिवस
-
मुंबई
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आझाद मैदानावर दाखल
-
-
जळगाव
एसटी कर्मचारी नाराज
विलिनीकरण केल्याशिवाय संप मागे घेणार नाही असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं
-
नाशिक
अनिल परब यांच्या घोषणेनंतर एसटी कर्मचारी बेशुद्ध
नाशिकच्या पंचवटी डेपोटील कर्मचारी नितीन जाधव यांना अली चक्कर
इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ हलवलं रुग्णालयात
-
मुंबई
गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आझाद मैदानाकडे रवाना
आझाद मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
-
मुंबई
सरकारच्या निर्णयावर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया
ही वेतनवाढ आम्हाला अजिबात मान्य नाही
सर्व कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे
विलिनीकरण झालं तर जनतेलाही फायदा होणार
बसच्या तिकिटात 40 टक्के कमी होईल – कर्मचारी
-
नाशिक
परिवहन मंत्र्यांच्या घोषणे नंतर देखील एसटी कर्मचा-यांचा आंदोलन मागे घेण्यास नकार
गाजर दाखवून केला घोषणेचा विरोध
सरकारने घोषणा केल्यानंतर घोषणाबाजी
गाजर नको विलीनीकरण हवं
-
पुणे
स्वारगेट डेपोतील कर्मचारी संप मागे घेणार नाही
विलिनीकरणाच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम
आजची पत्रकार परिषद ही संप फोडण्यासाठी असल्याच कर्मचाऱ्यांची भूमिका
-
सदाभाऊ खोत
7.30 वाजता आझाद मैदानावर भूमिका स्पष्ट करणार
कर्मचाऱ्यांशी बोलून संपावर भूमिका मांडणार
संप मागे घेणार की नाही याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार
-
मुंबई
सर्व कामगारांनी संप मागे घ्यावा
उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर रहा
अनिल परब यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
निलंबन मागे घेणार, सेवा समाप्ती मागे घेणार
-
मुंबई
ज्यांची सेवा 1 ते 10 वर्षे झाली आहे, त्यांच्या ठोक वेतनात 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आलीय
म्हणजेच ज्यांचं मूळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं, आता त्यांचं मूळ वेतन 17 हजार 395 रुपये झालेलं आहे
म्हणजेच ज्याचं पूर्ण वेतन 17 हजार 80 रुपये होतं ते आता पूर्ण वेतन हे 24 हजार 594 रुपये झालेलं आहे.
म्हणजेच 7 हजार 200 रुपयांची वाढ करण्यात आलीय
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता 10 तारखेच्या आत होणार
-
अनिल परब
जे कर्मचारी 1 ते 10 वर्ष कॅटेगरीत आहेत त्यांना 5000 रुपये पगारवाढ
12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार असेल
ज्यांचा पगार 17 होता तो 24 हजार असेल
सर्वसाधारण सात हजाराची वाढ
जवळजवळ 41 टक्के पगार वाढ
10 ते 20 वर्षे सेवा- मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ
20 वर्षापेक्षा अधिक झालेत त्यांना 2 हजाराने वाढ
-
अनिल परब
कामगारांचं म्हणणं होतं विलीनीकरण करावं आणि आमचं म्हणणं होतं की समितीसमोर विषय आहे, त्यामुळे निर्णय घेता येत नाही
त्यामुळे संप लांबतच चालला होता
विद्यार्थी आणि इतर वर्गाची गैरसोय होत होती
-
अनिल परब
या संपात कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी होती परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्याचं शासनात विलीनीकरण करावं
आम्ही आमची भूमिका मांडत होतो
उच्च न्यायालयात हा विषय गेला, त्यावेळी कोर्टाने एक त्रिसदस्यीय समिती बनवली होती
विलीनीकरणाचा निर्णय 12 आठवड्याच्या आत निर्देशाप्रमाणे घ्यावा
त्यात मुख्यसचिव, वित्त सचिव आणि परिवहन विभागाचे सचिव होते
या विलीनीकरणाबाबतचं म्हणणं समितीसमोर मांडावं आणि समितीने अहवाल मुख्यमंत्र्यांना द्यावा
त्यावर आपलं म्हणणं जोडून मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल कोर्टाला समोर द्यावा, असे कोर्टाचे निर्देश होते
-
मुंबई
अनिल परब यांची पत्रकार परिषद सुरू
गोपीचंद पडळकर, उदय सामंत पत्रकार परिषदेत उपस्थित
-
नांदेड
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा tv9 मराठीवर
संप स्थळावर आंदोलक पाहतायत tv9 मराठी
संपाबाबत काय निर्णय होतो याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष
-
कोल्हापूर
एसटी कर्मचारी पत्रकार परिषदेच्या प्रतीक्षेत
अनिल परब काय बोलणार याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष
-
मुंबई
परिवहन मंत्री अनिल परब आणि उदय सामंत सह्याद्रीवर दाखल
सह्याद्रीवरील बैठकीनंतर थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
अनिल परब पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
या घोषणेनंतर एसटी संप मागे घेतला जाईल, सूत्रांची माहिती
-
मुंबई
पगारवाढीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली
परिवहन मंत्री अनिल परब मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निघाले
अनिल परब सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना
सह्याद्री बैठकीची आणखी एक फेरी होईल
बैठकीनंतर अनिल परब पत्रकार परिषद घेऊन निर्णय घोषित करतील
-
गोपीचंद पडळकर
तोडगा काय काढायचा ते सरकारवर अवलंबून – पडळकर सकारात्मक तोडगा अधिकृतपणे सांगा सरकारने एसटी महामंडळाचा विचार केला पाहिजे
-
राम शिंदे ऑन एसटी संप
काही दिवसांपासून राज्यात एसटी चा संप सुरू आहेय
महाविकास आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांना चर्चेला देखील वेळ दिला नाही
आतापर्यंत 45 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या याला ठाकरे सरकार जबाबदार
या सरकार लक्ष दिलं पाहिजे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल
राज्यात तीन वेगवेगळ्या विचारांच सरकार असल्याने कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही त्यामुळे जनता होरपळतेय
या राज्यात एक सरकार नसून तीन पक्षाचे तीन सरकार आहेय
-
मुंबई
एसटी कर्मचारी संप मागे घेणार
मुख्यमंत्र्यांच्या पगारवाढीच्या मंजुरीनंतर संप मागे घेणार
टीव्ही 9 ला सूत्रांची माहिती
-
मुंबई
एसटी संपाबाबत 6 वाजता मोठी घोषणा
अनिल परब पत्रकार परिषद घेऊन करणार घोषणा
अनिल परब मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल
एसटी कर्मचाऱ्याच्या पगारवाढीमुळे सरकारी तिजोरीवर ताण
Published On - Nov 24,2021 5:26 PM