महाविकास आघाडी सरकारनं शब्द पाळला, राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर,अनिल परब यांची माहिती
राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर : ॲड. अनिल परब Anil Parab Package for Auto Drivers
मुंबई: राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे सोबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. (Maharashtra Transport Minister Anil Parab declare consolidated grant package for registered licence holder auto driver which announced by Uddhav Thackeray)
7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना अनुदान मिळणार
राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारक असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.
परिवहन विभाग प्रणाली विकसित करणार
रिक्षा परवाना धारकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याकरतापरिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे . त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल. कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे.
बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक
सदर प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या करीता रिक्षा परवाना धारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी “सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल.” असे आवाहन परिवहन मंत्री, ॲड. अनिल परब यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून रिक्षा चालकांसाठी 1500 रुपये जाहीर
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली तेव्हा विविध घटकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांसाठी 1500 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संचारबंदी लावताना राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं.
संबंधित बातम्या
(Maharashtra Transport Minister Anil Parab declare consolidated grant package for registered licence holder auto driver which announced by Uddhav Thackeray)