Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात 5 टप्प्यात शिथीलता देणार
Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवण्यात आल्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
Maharashtra Unlock update :मुंबई : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील अनलॉक (Maharashtra Unlock Update) विषयी माहिती दिली. महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. अनलॉक साठी कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे.. या जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आला आहे. या 18 जिल्ह्यात आता दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु होईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यात 50 टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचं म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबई लॉकडाऊन शिथील होणार नाही. तसंच मुंबई लोकलबातच्या निर्णयात तूर्तास कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. (Maharashtra Unlock update Vijay Wadettiwar gave information about unlock rules lockdown removed from 18 districts)
विजय वड्डेटीवार नेमकं काय म्हणाले?
लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील.
काय सुरु राहणार?
रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस 100 टक्के क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.
अनलॉक कोणत्या टप्प्यात होणार
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे दुसर्या टप्प्यात 5 जिल्हे तिसरा 10 जिल्हे चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे
लेवल एकमध्ये येणारे जिल्हे
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर,धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव, जालना लातूर नागरपूर नांदेड नाशिक परभणी,ठाणे ,वर्धा. वाशिम .यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे.
मुंबई दुस-या लेव्हलमध्ये
मुंबईत आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहेत. ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल
उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार
अनलॉकचा निर्णय उद्यापासून अंमलात आणला जाणार आहे. दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट बघून जिल्ह्याचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पाच लेव्हल कशा आहेत?
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
लेव्हल 2 मध्ये काय सुरु असणार?
लेव्हल 2 मध्ये 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरु असतील. मॉल चित्रपट गृह ५० टक्के क्षमेतेने सुरु असतील. लोकल सुरु असणार नाही. सार्वाजिनक जागा, खुले मैदान , माॉर्निंग वॉक आणि सायकल चालवण्यास परवागनी असेल. शासकीय आणि खासगी सगळी कार्यालय खुली असीतल. क्रीडा सायंकाळ सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत इनडोअर आणि आऊटडोर स्पोर्टस सुरु असतील. चित्रपट आणि मालिकांचं शुटिंग सुरु करण्यात येईल. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के क्षमेतेने सुरु असतील. लग्न सोहळा मंगल कार्यालयात 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत राहू शकतील. अंत्यविधी सोहळ्याला सगळ्यांना उपस्थितीत राहता येईल. मिटींग आणि निवडणूक हे कार्यक्रम 50 टक्के उपस्थितीत करण्यात येतील.
बांधकाम, कृषी कामे खुली करण्यात आली आहेत. ऑनलाईन , ई-कॉमर्स सुरु करण्यात आलं आहे. जीम सलून ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमेतेने सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय बस आसाम 100 क्षमतेने टक्के सुरू असतील. जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथं रेड झोन आहे तिथे जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
लेव्हल 3 मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात काय सुरु असेल?
अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पाहते 5 ते सकाळी 9 मुभा असेल. 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.
चौथ्या लेव्हलमध्ये काय सुरु असेल?
अत्यावश्यक सेवा 2 वाजेपर्यंत सुरु असतील. सरकारी खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर सकाळी 5 ते 9 पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरु राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न सभारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला 20 लोक उपस्थित राहू शकतील. बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करतील. शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार आहेत. ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असेल. संचार बंदी लागू असणार आहे. सलून, जिम 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. बसेस ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. बसमध्ये प्रवाशांना उभं राहता येणार नाही.
संबंधित बातम्या:
कोरोनाचा काळ संपल्यानंतर महाराष्ट्र दौरा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडेंचा एल्गार
Maharashtra Unlock update Vijay Wadettiwar gave information about unlock rules lockdown removed from 18 districts