Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra vaccination plan : महाराष्ट्राचा अॅक्शन प्लॅन ठरला, परदेशातून लसी मागवणार, 10 कोटींचं टार्गेट

लसीकरणाबाबत महाराष्ट्राचा अॅक्शन प्लान ठरल्याचंही टोपेंनी सांगितलं. परदेशातून लसी मागवल्या जाणार असल्याचं टोपे म्हणाले.

Maharashtra vaccination plan : महाराष्ट्राचा अॅक्शन प्लॅन ठरला, परदेशातून लसी मागवणार, 10 कोटींचं टार्गेट
लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचा प्लॅन, परदेशातून लस मागवण्याची केंद्राकडे मागणी
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 6:52 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 15 दिवस ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते. पण तरीही राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. अशावेळी राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या त्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यावेळी मुख्यमंत्री कडक लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर करतील असंही टोपे यांनी सांगितलंय. तसंच लसीकरणाबाबत महाराष्ट्राचा अॅक्शन प्लान ठरल्याचंही टोपेंनी सांगितलं. परदेशातून लसी मागवल्या जाणार असल्याचं टोपे म्हणाले. (Maharashtra government corona vaccination plan Demand for vaccine from other countries)

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्राकडे केल्याचंही टोपे यांनी सांगितलं. लसीकरण वाढलं की हर्ड इम्युनिटीच्या दिशेने आपण जाऊ शकू, असंही टोपे म्हणाले. भारतातील लसीचं उत्पादन मर्यादित आहे. महाराष्ट्रातील किमान 10 कोटी जनतेला लस द्यायची म्हटलं तरी देशातील लसी पुरणार नाहीत, त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्या, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने लॉकडाऊनचा निर्णय

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावला जावा अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारुन हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रय़त्न सुरु आहे, असं सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्याचबरोबर आम्ही पूर्ण लॉकडाऊनची मागणी केलीय. लोकं फिरतायेत, बेड मिळत नाही, मृत्यू होतोय, हे पाहू शकत नाही. लॉकडाऊन हा आवडीचा विषय नाही. पण त्याशिवाय पर्याय नाही. तो निर्णय आता मुख्यमंत्री जाहीर करतील, अशी माहितीही शिंदेंनी दिलीय.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा रद्द निर्णय घेतल्याची माहिती दिली. मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील याविषयावर मत मांडले. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळं प्रत्यक्ष पद्धतीनं शाळा भरल्या नाहीत. वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु होते. पण, देशातील इतर सात राज्यांमध्ये ती पुढे ढकलण्यात आली आहे त्याप्रमाणं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. संपूर्ण मंत्रिमंडळानं तो निर्णय मान्य केला, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

बारावीची परीक्षा होणार

राजेश टोपे यांनी दहावीची परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षण खाते काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra lockdown Update : महाराष्ट्रात येत्या काही तासात कडक लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्या संवाद साधणार?

Lockdown: राज्यात कोरोनाची नवी नियमावली लागू; दुकानं फक्त सकाळी 7 ते 11च्या वेळेत सुरु राहणार

Maharashtra government corona vaccination plan Demand for vaccine from other countries

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.