निकालाने तोंडचे पाणी पळवले… हॉटेल पॉलिटिक्स, एअर लिफ्टिंग आणि घोडेबाजाराला लगाम

Maharashatra Vidhansabha Election Result 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात जनता जनार्दनाने महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान झाले. त्यामुळे यावेळी काय झाडी आणी काय डोंगरचे चित्र, हॉटेल पॉलिटिक्सलाच नाही तर घोडेबाजाराला पण लगाम लागला. या नवीन चित्रामुळे राज्याचे राजकारण पुर्णपणे पालटून गेले आहे. राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

निकालाने तोंडचे पाणी पळवले... हॉटेल पॉलिटिक्स, एअर लिफ्टिंग आणि घोडेबाजाराला लगाम
महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग प्रशस्त
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 12:16 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनाने महायुतीचा भरभरून मतदान केले. महायुतीने संपूर्ण राज्यात मोठी आघाडी घेतली. त्यात भाजपा हा 127 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिंदे सेना 56 आणि अजितदादांची राष्ट्रवादी 38 जागांवर पुढे आहे. हा मोठा उलटफेर आहे. एक्झिट पोलने महायुतीला जो कौल दिला होता. त्यापेक्षा रेकॉर्डब्रेक आघाडी महायुतीने घेतली आहे. तर महाविकास आघाडी केवळ 50 जागांवर आडवी झाली आहे. त्यामुळे यावेळी काय झाडी आणी काय डोंगरचे चित्र, हॉटेल पॉलिटिक्सलाच नाही तर घोडेबाजाराला पण लगाम लागला.

हॉटेल पॉलिटिक्सला ब्रेक

गेल्या काही वर्षांपासून राज्यातच नाही तर देशातील राजकारणाला हॉटेल पॉलिटिक्सचे वेड लागले आहे. 2019 मध्ये भाजप शिवसेना फाटाफूट झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. कोरोना काळ संपताच या सरकारला भाजपाने सुरूंग लावला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वात शिवसेनेतील मोठा गट बाहेर पडला. सुरूवातीला हा गट सुरत नंतर गुवाहाटी आणि सरते शेवटी गोव्यात राहिला. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी मुंबईत दाखल झाला.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी महाविकास आघाडीतून पन्नास खोके-एकदम ओकेचा नारा खूप गाजला होता. घोडेबाजारातून हे सरकार अस्तित्वात आल्याचा आरोप करण्यात आला होता. देशात इतर राज्यातही असाच प्रकार झाला. त्यामुळे राजकारण आणि राजकारण्यांविषयी जनतेच्या मनात सुप्त नाराजी दिसून येत होती. राजकारण हा चर्चेचा नाही तर तिटकार्‍याचा विषय ठरत होता. लोकसभेत जनतेने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले होते. तर आता विधानसभेला अपक्ष डोईजड ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे पुन्हा एकदा घोडेबाजाराची शक्यता वर्तवण्यात येत होती.

पण यावेळी बहुमत पूर्णपणे महायुतीच्या बाजूने झुकले. महाविकास आघाडीचा सुपडा वाजला. या नवीन अपडेटमुळे एक मोठी घडामोडी घडली. यावेळी आमदारांची पळवापळवी अथवा हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरजच जनतेने पडू दिली नाही. महायुतीच्या बाजुने मतदारांनी कौल दिला. यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी कुणाचा टेकू घेण्याची गरज राहिली नाही. महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग प्रशस्त झाला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.