Maharashtra budget session 2021 LIVE |  टीव्ही 9 इम्पॅक्ट : वरळीतील नाईट क्लबवर कारवाई होणार

| Updated on: Mar 24, 2021 | 7:03 AM

शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. (Maharashtra Budget Session Day 1)

Maharashtra budget session 2021 LIVE |  टीव्ही 9 इम्पॅक्ट : वरळीतील नाईट क्लबवर कारवाई होणार
Aditya Thackeray

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) आजपासून सुरु झालं आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे. सरकार अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचं नाटक करतंय. वाढीव वीज बिल प्रश्नी आणि संजय राठोडप्रश्नी उघडं पडण्याची भीती असल्यानं सरकारला अधिवेशनातून पळ काढायचाय, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंमत असेल, तर अविश्वास ठराव आणून दाखवा, असं खुलं आव्हान दिलं होतं. (Maharashtra Vidhi Mandal Budget Session Day 1 Live Update)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Mar 2021 01:01 PM (IST)

     टीव्ही 9 इम्पॅक्ट : वरळीतील नाईट क्लबवर कारवाई होणार

     Worli night club टीव्ही 9 इम्पॅक्ट : वरळीतील नाईट क्लबवर होणार कारवाई, वरळीतले पब्ज सील करुन कारवाई करणार, मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा  

    संबंधित बातमी 

    वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीस 

  • 01 Mar 2021 12:17 PM (IST)

    दादा म्हणाले, 12 आमदारांची यादी जाहीर करा, महामंडळ घोषित करु, फडणवीस म्हणाले, पोटातलं ओठावर आलं

    Maharashtra Budget Session 2021 update:

    सुधीर मुनगंटीवार

    वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? विदर्भ, मराठवाड्यात लोकं राहतात हे लक्षात‌ ठेवावे – सुधीर मुनगंटीवार

    आजित पवार

    विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, बजेटमध्ये मी तसा निधी देऊ, ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु, त्या आमदारांची नावं जाहीर करावी

    देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

    दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाड़ा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही

    दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाड़ा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही, फडणवीसांचा हल्लाबोल

  • 01 Mar 2021 12:05 PM (IST)

    कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला? सभागृहात फडणवीस आक्रमक

    आमचं म्हणणं ऐकलं जात नसेल तर आम्ही एक मिनिट बसणार नाही, कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक

  • 01 Mar 2021 11:50 AM (IST)

    आत्महत्या पूजा चव्हाणची असो की डेलकरांची, चौकशी झालीच पाहिजे – फडणवीस

    मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हावी, सुसाईड नोट जिथे असते तिथे चौकशी होतेच, पण मी दाव्याने सांगतो त्यात कुठल्याही भाजप नेत्याचं नाव नाही, जर असती तर त्यांनी ती घोषित केली असती, डेलकरांची आत्महत्या दुर्दैवी, आत्महत्या पूजा चव्हाणची असो की डेलकरांची, चौकशी झालीच पाहिजे

  • 01 Mar 2021 11:49 AM (IST)

    अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात…

    राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. ते स्वत:च निर्णय घेतात. मुख्यमंत्र्यांनी दिलेले सल्ले मंत्री पाळत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    संविधानानं जी जबाबदारी टाकलेली आहे ती झटकण्याचं काम सुरु आहे. राज्यपालांनी नियम 6 नुसार अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची सूचना दिली आहे. अजित पवार अविश्वास ठराव आणण्याचं आव्हान का देतात.

  • 01 Mar 2021 11:42 AM (IST)

    काँग्रेसचा सायकल मोर्चा हा मीडिया इवेंट – फडणवीस

    राज्यात काँग्रेसची अवस्था वाईट आहे, काँग्रेसचा सायकल मोर्चा हा मीडिया इवेंट, 27 रुपये पेट्रोल आणि डिझेलवर त्याठिकाणी लावलेला आहे,  खरंच बघितलाच केंद्र सरकारचा एकूण 33 रुपये त्याच्यामध्ये चार रुपये हे कृषी चार रुपये कमिशन आहे, उर्वरित हे पैशात त्यातले 42 टक्के पैसे केंद्र सरकारकडे येतात येथे राज्याला परत करताना राज्य सरकारने मात्र 27 रुपये पेट्रोलवर लावलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की नाना पटोले पश्चाताप समृद्ध असावं किंवा 27 रुपयाचा टॅक्स कमीत कमी करावा आणि दुसरा क्रमांक किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान दहा रुपये हे पेट्रोल डिझेल स्वस्त करावं आंदोलन असावा तेव्हा दुसरी शंका अशी आहे हुशार आहे

  • 01 Mar 2021 11:39 AM (IST)

    काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणचे केवळ फार्स, नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं: देवेंद्र फडणवीस

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 32 रुपये आहे. राज्य सरकारनं 27 रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

    काँग्रेसला विरोधी पक्षांची जागा घेता येणार नाही. देशात काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे, अशा अवस्थेत मीडिया इवेंट ते करत आहेत. वीज बिलाचा मुद्दा महत्वाचा आहे. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राज्यात यापूर्वी कधी झाली नाही.

    अतिवृष्टीची मदत झाली नाही. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर राज्य सरकारला घेरणार आहोत.

    मोहन डेलकर यांची आत्महत्या दुर्दैवी आहे. पूजा चव्हाणची आत्महत्या देखील दुर्दैवी आहे.  कालच्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्र्यांची परिस्थिती केविलवाणी पाहायला मिळाली.

    मुख्यमंत्र्यांनी केवळ ऑडिओ क्लिप खऱ्या आहेत की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडलं ते खरं की खोट याबाबत उत्तर द्यावं.

    मराठा आरक्षणप्रश्नी विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे. नरेंद्र मोदी यांनी जी लोकं कोरोना लसीबाबत चुकीची माहिती पसरवत होती त्यांना उत्तर दिलं आहे.  दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला वेग मिळणार आहे.

  • 01 Mar 2021 11:23 AM (IST)

    आर्थिक अडचण असूनही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी

    औद्योगिक मंदी असताना राज्य सरकारनं चांगलं काम केले. रोजगार मिळणे सुलभ व्हावं म्हणून महारोजगार आणि महाजॉब्ज पोर्टल सुरु केले आहे. राज्य सरकारनं आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे.

    मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आरे जंगलाला राखीव वनक्षेत्र जाहीर केले आहे.

    हॉस्पिटलिटी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला गेला. राज्यातील पर्यटन क्षेत्राला  यामुळे चालना मिळेल.

    शेतमालाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळवून  देण्यासाठी योजना राबवली गेली. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी योजनांची माहिती मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टल, त्यावर 11 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली.

    राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 245 कोटी रुपये वितरीत करण्यात आले. कुपोषित बालकांना दूध भूकटीचे वाटप करण्यात येत आहे.

    कृषीपंप जोडणीसाठी नवीन धोरण

    कृषीपंपासाठी दिवसा वीज उपलब्ध होईल. पंतप्रधान कुसुम योजनेद्वारे सौरपंप उपलब्ध करुन दिले जातील.

  • 01 Mar 2021 11:05 AM (IST)

    राज्यपालांकडून कोरोना योद्ध्यांना अभिवादन

    राज्यपालांनी  कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत अभिभाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सव यावर्षी साजरा केला जाणार आहे.

    धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केले आहे. राज्य सरकारनं कोरोना संदर्भात मदतीसाठी कोरोना टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.  कोरोना चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या आहेत.

    महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला. कोरोना विरुद्धची लढाई सुरु असून राज्य सरकारनं मी जबाबदार ही योजना सुरु केलीय. कोरोना संदर्भातील आरोग्य संदर्भातील उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. राज्यात 500 प्रयोगशाळा सुरु आहेत.

    राज्यपालांकडून अभिभाषणात केंद्र सरकारकडून मिळालेल्या आणि येणे बाकी वस्तू व सेवा कराच्या परताव्याची माहिती जाहीर केली गेली. राज्य सरकारनं 26 जानेवारी 2020 ला शिवभोजन योजना सुरु केली गेली. शिवभोजन योजना यशस्वी झाली.

    शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी विक्रमी खरेदी केली. राज्य सरकारनं धान उत्पादकांच्या खात्यात रक्कम जमा केली.

    राज्य सरकारनं कोरोना प्रादुर्भाव असल्यानं अंगणवाडीत  न येऊ शकणाऱ्या बालकांना आणि गर्भवती मातांना घरपोहोच शिदा पुरवला आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरु हा उपक्रम राबवण्यात आला. देशभरात दिशा अ‌ॅपच्या वापरात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

  • 01 Mar 2021 11:03 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधिमंडळात दाखल

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं विधिमंडळाचं अभिभाषण सुरु होणार आहे.

  • 01 Mar 2021 10:58 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधिमंडळ परिसरात दाखल

    विधिमंडळ अधिवेशनासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दाखल झाले आहेत.राज्यपाल अभिभाषणात काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे. राज्यपाल आणि सरकारमधील संघर्ष याच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे.

  • 01 Mar 2021 10:49 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून विधिमंडळ परिरसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून विधिमंडळ परिरसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन

  • 01 Mar 2021 10:46 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ परिरसरात दाखल

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ परिरसरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे.

  • 01 Mar 2021 10:45 AM (IST)

    काँग्रेस आणि भाजपचे आमदार आमनेसामने

    पेट्रोल-डिझेल दरवाढी आंदोलनावर काँग्रेस आणि भाजपचे आमदार आमने-सामने, विधिमंडळात एकमेकांच्या समोर घोषणाबाजी, केंद्र सरकारचे लोक लपून बसले, आधी थोडे दर वाढले तरीही आंदोलन करायचे, बाळासाहेब थोरातांचा टोला, तर वीज बिल प्रश्नी भाजप नेत्यांची सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

  • 01 Mar 2021 10:43 AM (IST)

    वीज बिलाच्या मुद्यावरुन भाजप आमदारांची विधीमंडळ परिसरात घोषणाबाजी

    पेट्रोल-डिझेल दरवाढी आंदोलनावर काँग्रेस आणि भाजपचे आमदार आमने-सामने विधिमंडळात एकमेकांच्या समोर घोषणाबाजी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवछत्रपती पुतळ्याला अभिवादन, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्व आमदारांसोबत विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले, भाजपचे सर्व नेते आमदार एकवटले. भाजप नेत्यांची घोषणाबाजी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी वीज बिल च्या विरोधात

  • 01 Mar 2021 10:41 AM (IST)

    केंद्र सरकार लुटारुप्रमाणं वागतंय, दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

    सामान्यांच्या तोंडातील घास हिसकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोदी सरकार रोज पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवले जात आहेत. केंद्र सरकार 18 रस्ते विकास आणि 4 रुपये शेतकऱ्यांच्या नावानं घेतले जातात. केंद्रानं रस्ते विकण्याचं जाहीर केलं आहे. केंद्र सरकार लुटारु प्रमाणं वागतेय.

  • 01 Mar 2021 10:36 AM (IST)

    शिक्षणमंत्र्यांच्या कारभाराला कंटाळून दोन कुलगुरुंचा राजीनामा: आशिष शेलार

    मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी ते माध्यमांशी संवाद साधत होते. उच्च व तंज्ञ शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कंटाळून दोन दोन कुलगुरुंनी राजीनामा दिल्याचा आरोप शेलार यांनी केला. तर, शिवसेनेने संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न करु नये, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

  • 01 Mar 2021 10:18 AM (IST)

    काँग्रेस मंत्री-आमदार सायकलने विधानभवनात

    इंधन दरवाढीवर काँग्रेसचं आंदोलन, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन, काँग्रेस मंत्री-आमदार सायकलने विधानभवनात येणार

  • 01 Mar 2021 10:08 AM (IST)

    विधानभवनाशी संबंधित 32 जणांना कोरोनाची लागण

    विधानभवन अधिवेशन पहिल्या दिवशी 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड, विधीमंडळ, मंत्रालय, पोलिस सुरक्षा, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांचा समावेश, विधीमंडळात कोरोना चाचणी केलेल्या एकाही आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह नाही

Published On - Mar 01,2021 1:01 PM

Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.