AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंडला रेस्टॉरंटमधून पार्सल नेता येणार नाही, वाचा संपूर्ण नियमावली

शनिवारी आणि रविवारी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलीव्हरी सेवा सुरु राहणार, ग्राहकांना प्रत्यक्ष जाऊन जेवण पार्सल नेता येणार नाही (Weekend Lockdown Guidelines Hotel Restaurant )

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंडला रेस्टॉरंटमधून पार्सल नेता येणार नाही, वाचा संपूर्ण नियमावली
Restaurant
| Updated on: Apr 05, 2021 | 11:36 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल) लॉकडाऊन करण्यात येईल. तर आजपासून (5 एप्रिल) दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू राहील. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे, मात्र त्याविषयी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. वीकेंड लॉकडाऊनच्या वेळी ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये जाऊन पार्सल नेता येणार नाही, मात्र होम डिलीव्हरीचा पर्याय उपलब्ध असेल. (Maharashtra Weekend Lockdown Rules and Guidelines for Hotel Restaurant Bar Take Away parcel Service)

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठी ब्रेक द चेन नियम

– सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवावे लागणार – रेस्टॉरंट्सना ग्राहकांना पार्सल सेवा किंवा होम डिलीव्हरी सेवा देण्यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी – शनिवारी आणि रविवारी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलीव्हरी सेवा सुरु राहणार, ग्राहकांना प्रत्यक्ष जाऊन जेवण पार्सल नेता येणार नाही – निवासी सेवा पुरवाणाऱ्या हॉटेल्सच्या बार आणि रेस्टॉरंट्सना केवळ हॉटेलमध्ये वास्तवास असलेल्या पाहुण्यांना सेवा देता येणार – 10 एप्रिलपासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा RTPCR कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक – ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी 15 दिवसांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार – RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड – हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण लवकर करुन घ्यावं

महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

– ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह दोन प्रवाशांना परवानगी – टॅक्सीत ड्रायव्हरसह एकूण प्रवासी संख्येच्या 50 टक्के प्रवासी बसवण्यास परवानगी – सार्वजनिक वाहतुकीतील सर्वांनी मास्क वापरणं बंधनकारक, न वापरल्यास 500 रुपये दंड – सार्वजनिक वाहतुकीत असणाऱ्या व्यक्तीने आपले कोव्हिड लसीकरण करुन घ्यावे – 10 एप्रिलपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर आणि स्टाफला कोरोना निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट बंधनकारक – रिपोर्ट जवळ न ठेवल्यास प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड – ड्रायव्हरने गाडीत स्वतःला प्लॅस्टिक कव्हरने प्रवाशांपासून विलग ठेवल्यास RTPCR रिपोर्टची गरज नाही – लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामध्ये जनरल डब्यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई – सर्व प्रवाशांनी मास्क घालून प्रवास करण्याची गरज (Weekend Lockdown Guidelines Hotel Restaurant )

महाराष्ट्रात खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

– खाजगी वाहनधारकांसह बसेसला सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी – येत्या शुक्रवारी (9 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही – केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत परवानगी – खासगी बसेसमधील कर्मचारी आणि स्टाफने कोरोना लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावं – 10 एप्रिलपासून खाजगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना RTPCR चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक – ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी 15 दिवसाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार – RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड

संबंधित बातम्या :

राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

Maharashtra Weekend Lockdown | सार्वजनिक आणि खासगी वाहनांसाठी महत्त्वाचे नियम

(Maharashtra Weekend Lockdown Rules and Guidelines for Hotel Restaurant Bar Take Away parcel Service)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.