कोरोनाकाळात महाविकास आघाडीकडून 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार; या पक्षाने थेट आरोग्य मंत्र्याकडेच केली तक्रार
रेमडिसिव्हर इंजेक्शनमध्ये घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबतची तक्रारही त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.
मुंबई : कोरोना काळात महाविकास आघाडीचे सरकार असताना, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीतून बाहेरच पडले नाहीत अशी वारंवार टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. त्यातच किरीट सोमय्या यांच्याकडूनही कोरोना काळात आरोग्य विभागामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही केला जातो. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता थेट त्या वेळचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप करत कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारकडून जवळपास 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपर मनसेकडून करण्यात आला आहे. त्याप्रकारची तक्रार त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडेही करण्यात आली आहे.
या घोटाळ्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या शिष्टमंडळाने तानाजी सावंत यांची भेट घेऊन ही तक्रार दाखल करणार आहेत.
या तक्रारीमुळे आता पुन्हा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना काळात महाविकास आघाडीने नागरिकांच्या आरोग्य बाबत काळजी घेतली.
नवनव्या योजना आखून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी कशी होईल याकडे लक्ष दिले गेले हे महाविकास आघाडीनेही वेळोवेळी सांगितले आहे.
त्याबाबत राष्ट्रीय पातळीवरही उद्धव ठाकरे यांचा गौरव केला आहे. तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
त्याकाळी 25 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची टीका करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाविकास आघाडीच्या काळात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात आल्या.
या योजना नागरिकांसाठी राबवण्यात आल्या असल्या तरी, त्यामध्ये त्या काळातील आरोग्य मंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत महाविकास आघाडी सरकारच्या कोरोना काळात झालेल्या भष्ट्राचाराची चौकशी करण्त यावी अशी मागणी मनसेने केली आहे. कोरोना काळात जो घोटाळा झाला आहे,
त्यावेळी रेमडिसिव्हर इंजेक्शनमध्ये घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबतची तक्रारही त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.