“नागपूरच्या विजयानं महाविकास आघाडी आजही भक्कम आहे हे दाखवून दिलय”; ठाकरे गटाच्या नेत्यानं निकालानंतर विजयाची कारणं सांगितली
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथे जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. नागपूर मतदार संघ हा भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ असल्याने महाविकास आघाडीनेही नागपूरसाठी जोरदार तयारी केली होती
मुंबईः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका लागल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटातील महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. राज्यातील पाच मतदार संघाच्या निवणूका होत होत्या मात्र नागपूर आणि नाशिक मतदार संघाच्या उमेदवारांकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे सुधाकर आडबाले यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीने नागपूरमध्ये कंबर कसली होती.
त्यामुळे नागपूर विभागामध्ये सुधाकर आडबाले विजयी होताच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नागपूरमधील महाविकास आघाडीचा विजय हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पराभव असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथे जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. नागपूर मतदार संघ हा भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ असल्याने महाविकास आघाडीनेही नागपूरसाठी जोरदार तयारी केली होती.
सुधाकर आडबाले यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीबरोबरच त्यांच्या मित्र पक्षानेही मदत केल्याने ही सुधाकर आडबाले विजयी झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या या विजयामुळे महाविकास आघाडी आजही भक्कम आहे हे दाखवून दिलं आहे असे मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये कोकण विभागामध्ये भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. त्या निकालाबद्दल बोलताना विनायक राऊत यांनी भाजपरवर जोरदार निशाणा साधत कोकणात पैसा आणि सत्तेचा वापर करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर शुभांगी पाटील यांनी ज्या पद्धतीने लढा दिला आहे तो खरच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.