4 नराधमांचा कुत्र्यावर गँगरेप, उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू

मुंबई: चार विकृतांच्या लिंगपिसाटपणाने एका कुत्र्याचा जीव घेतला आहे. ड्रग्जच्या नशेत धुंद असलेल्या चार विकृतांनी चक्क कुत्र्यावर गँगरेप केला. या गँगरेपमुळे विव्हळत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुत्र्याला प्राणीप्रेमींनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान कुत्र्याने अखेरचा श्वास घेतला. 18-19 नोव्हेंबरदरम्यान या कुत्र्यावर मालाडमधील मालवणी परिसरात चार नशेबाजांनी गँगरेप केला होता. काय आहे संपूर्ण प्रकरण? माणसांमधील विकृतीने कळस […]

4 नराधमांचा कुत्र्यावर गँगरेप, उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई: चार विकृतांच्या लिंगपिसाटपणाने एका कुत्र्याचा जीव घेतला आहे. ड्रग्जच्या नशेत धुंद असलेल्या चार विकृतांनी चक्क कुत्र्यावर गँगरेप केला. या गँगरेपमुळे विव्हळत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुत्र्याला प्राणीप्रेमींनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान कुत्र्याने अखेरचा श्वास घेतला. 18-19 नोव्हेंबरदरम्यान या कुत्र्यावर मालाडमधील मालवणी परिसरात चार नशेबाजांनी गँगरेप केला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

माणसांमधील विकृतीने कळस गाठल्याचं पुन्हा एकदा समोर आलं. बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता किळसवाणा प्रकार घडला. चार नराधमांनी चक्क कुत्र्यावर बलात्कार केला. हा किळसवाणा प्रकार मालाडमधील मालवणी परिसरात घडला. धक्कादायक म्हणजे आरोपी नराधम कुत्र्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेले. ‘अॅनिमल मॅटर टू मी’ या प्राणीमित्रांच्या स्वयंसेवी संस्थेने हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

“पीडित कुत्रा दिवसभर बेपत्ता होता. तो मालवणी परिसरातील चर्च परिसरात आढळला. तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. त्याच्या गुप्तांगालाही दुखापत झाली आहे. या कुत्र्यावर प्रचंड आघात झाला आहे.  त्याच्याजवळ कोणी गेलं किंवा त्याला स्पर्श केला तर तो जोरजोरात ओरडून घाबरुन जात होता”, असं ‘अॅनिमल मॅटर टू मी’ या संस्थेच्या संस्थापिका डॉ अंकिता पाठक यांनी सांगितलं.

कुत्र्याच्या पुढच्या पायांना दुखापत झाली आहे. सध्या डॉक्टर कुत्र्यावर उपचार करत आहेत.

मालवणी परिसरातील स्थानिक सुधा फर्नांडिस या नेहमी कुत्र्यांना खाऊ घालतात. मात्र या कुत्र्याला नेहमीप्रमाणे खाऊ घातला असता, तो कुत्रा विव्हळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तो कोणालाही स्पर्श करु देत नव्हता.

यादरम्यान एका रिक्षा चालकाने फर्नांडिस यांना दिलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. चार जणांनी या कुत्र्यावर बलात्कार केल्याचं रिक्षा ड्रायव्हरने फर्नांडिस यांना सांगितलं. “आरोपींनी कुत्र्याचे पाय बांधले होते, कुत्रा ओरडत होता, त्यामुळे आपल्याला हा प्रकार समजला. आरोपींचा विकृतपणा रोखण्यासाठी आपण गेलो असता आरोपींनी धूम ठोकली” असं रिक्षाचालकाने फर्नांडिस यांना सांगितलं.

दरम्यान, फर्नांडिस यांनी या सर्व प्रकारानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

संबंधित बातम्या 

मुंबईत विकृतीचा कळस, चौघांचा कुत्र्यावर गँगरेप

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.