VIDEO | मलिकांच्या जावयाचीही पुन्हा चौकशी करा, कुठलाही नेता देशापेक्षा मोठा कसा; मोहित कंबोजांच्या फैरी

महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध उघड होतील.आपल्याला देशाविरोधी कारवाई करणारे नेते हवेत आहेत का, कोणताही पक्ष, नेता देशापेक्षा, राज्य घटनेपेक्षा मोठा कसा असू शकतो, असा सवाल गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

VIDEO | मलिकांच्या जावयाचीही पुन्हा चौकशी करा, कुठलाही नेता देशापेक्षा मोठा कसा; मोहित कंबोजांच्या फैरी
मोहित कंबोज, भाजप नेते.
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 10:14 AM

मुंबईः महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध उघड होतील. आता त्यांच्या जावयाचीही पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी मुंबई भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली. त्यामुळे मलिक यांच्या अटकेवरून आता राजकीय सामन्याला सुरुवात झाली आहे. नवाब मलिकांना काल अटक केल्यानंतर ईडीकडून पीएमएलएच्या कलम 19 द्वारे गुन्हा दाखल केल्याचे अनिल सिंग यांच्याकडून कोर्टात सांगण्यात आले. हसीना पारकर यांच्याकडून नवाब मलिक यांच्या नावावर मालमत्ता वर्ग झालीय. त्यामुळे ईडीकडून पीएमएलएच्या कलम 19 द्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय, तसेच 55 लाखांची रक्कम यासाठी देण्यात आली होती, असा दावा करण्यात आला. या आधारे कोर्टाने मलिकांना 3 मार्चनंतर ईडी कोठडी सुनावलीय.

कंबोज काय म्हणाले?

मुंबई भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आरोपांची राळ उडवून दिली. कंबोज म्हणाले की, ईडीच्या चौकशीत नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध उघड होतील, असा दावा त्यांनी केला. आता नवाब मलिक यांच्या जावयाचीही पुन्हा चौकशी करावी. आपल्याला देशाविरोधी कारवाई करणारे नेते हवेत आहेत का, कोणताही पक्ष, नेता देशापेक्षा मोठा कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

असा माणूस पदावर हवा का?

कंबोज म्हणाले, मुंबईच्या 1993 च्या बॉम्बस्फोटाने देशाला हादरवून सोडले. त्यामुळे शेकडो बळी गेले. अशा व्यक्तींशी तुम्ही व्यवहार करता. हा बॉम्बस्फोट मुंबईकरांची भळभळती जखम आहे. महाविकास आघाडीने यावर गंभीरपणे आत्मपरीक्षण करावे. खरेच असा माणूस पदावर हवा आहे का, असा सवाल त्यांनी केला. आता मलिकांचे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे काय संबंध हे सुद्धा जनतेला कळावं. त्यांच्या मुलाने कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला हे देखील पाहिले आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

नवाब मलिक यांच्या जावयाचीही पुन्हा चौकशी करावी. आपल्याला देशाविरोधी कारवाई करणारे नेते हवेत आहेत का, कोणताही पक्ष, नेता देशापेक्षा मोठा कसा असू शकतो.

– मोहित कंबोज, भाजप नेते

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.