अमृता फडणवीस वर्षा बंगला सोडावा लागल्याच्या फ्रस्टेशनमध्ये, मनिषा कायंदे राणीबागेतल्या पेंग्विनबाबत म्हणतात…

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पेंग्विनच्या नाव ठेवण्यावरूनही महापौर आणि भाजपच्या नगरसेविकांमध्ये वाद रंगल्याचे दिसून आले आहे.

अमृता फडणवीस वर्षा बंगला सोडावा लागल्याच्या फ्रस्टेशनमध्ये, मनिषा कायंदे राणीबागेतल्या पेंग्विनबाबत म्हणतात...
मनिषा कायंदेंची अमृता फडणवीसांवर टीका
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 5:02 PM

मुंबई : राज्यातलं राजकारण तापलं असताना मुंबईत पेंग्विनचा (Penguin) मुद्दा पुन्हा गाजतोय. कारण मुंबईतील राणीच्या बागेत आणलेल्या पेंग्विनवरून आणि त्यावर होणाऱ्या खर्चावरून भाजपाने महापालिकेतील (BMC) सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे, त्याला शिवसेना (Shivsena) नेत्यांकडूनही उत्तर देण्यात येत आहेत. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पेंग्विनच्या नाव ठेवण्यावरूनही महापौर आणि भाजपच्या नगरसेविकांमध्ये वाद रंगल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील पेंग्विन सेक्शन आहे, तो मुंबई महानगरपालिका चालवते आणि अहमदाबाद महानगरपालिकेचे पेग्विन पार्क कंत्राटदार चालवत आहेत आणि तिथला प्रत्येक प्राणी पाहण्यासाठी वेगळी तिकीट आकारली जात आहेत. अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच मुंबईच्या महापौर यावर अधिक प्रकाश टाकतील आणि पोलखोल करतील, असेही त्या म्हणाल्या आहेत.

अमृता फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये

अमृता फडणवीस यांच्याकडून सतत ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे, त्यालाही मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. अमृता फडणवीस यांना वर्षा बंगला सोडावा लागला त्यामुळे नंतर त्या फ्रस्टेशनमध्ये गेल्याने तसे त्या बोलत आहेत, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. त्यांनी जनतेत येऊन काम करावं, भाजपने त्यांना प्रवक्ता जाहीर करावं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. काही वेळापूर्वीच अमृता फडणवीस यांनी नामर्द, बिगडे नवाब आणि नन्हें पटोले म्हणत आघाडीतील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.  त्यावरही आता जोरदार वाद पेटण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांना मंत्री नवाब मलिक यांनी उपमा दिली आहे. याबद्दल मी बोलणार नाही, ते फक्त इंटरटेनमेंट करत आहेत. संजय राऊत यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, फुकटचे वायफळ आरोप करू नये, असेही त्या म्हणाल्या. तसेच अडीच वर्ष कशी घालवायची, यासाठी ते रोजचेच कार्यक्रम करतात, भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांना निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे भाजप नेते अशी वक्तव्य करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

राज्यात अनेक समस्या मात्र सरकारला केवळ मद्यविक्रीतच रस; वाईन पॉलिसीवरून नवनीत राणा यांचा टोला

नॉटी, नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले…अमृता फडणवीसांची 100 मार्कांची प्रश्नपत्रिका

VIDEO: खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती: संजय राऊत

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.