Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : ‘मराठा आरक्षणाबद्दल जरांगेंनी मविआकडून लिहून घ्यावं की…’; मनोज जरांगेनी राजेंद्र राऊतांचे चॅलेंज स्वीकारले
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत आमनेसामने आले आहेत. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलांना आव्हान दिलंय. दरम्यान त्यांचं आव्हान जरांगे पाटलांनी देखील स्वीकारलंय. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.
मराठा आरक्षणावरुन आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगेंमध्ये चांगलीच जुंपली असून एकमेकांकडून आव्हान-प्रतिआव्हान देण्यात येतंय. मराठा आरक्षणासंदर्भात मविआकडून लिहून घ्या असं आव्हान राजेंद्र राऊतांनी जरांगे पाटलांना दिलंय. दरम्यान राजेंद्र राऊतांनी दिलेलं आव्हान मनोज जरांगे पाटलांनी देखील स्विकारलंय.
मराठा आरक्षणाबद्दल जरांगेंनी मविआकडून लिहून घ्यावं एवढंच नव्हे राजेंद्र राऊतांनी उदयनराजे भोसले यांच्यावरुनही जरांगे पाटलांवर आरोप केलाय. मी फुंकलो असतो तर उदयनराजे पडले असते असं जरांगे म्हणाल्याच राऊतांनी म्हटलं. दरम्यान यानंतर जरांगे पाटलांनी देखील राजेंद्र राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. मनोज जरांगेंनी राजेंद्र राऊतांना धारेवर धरत देवेंद्र फडणवीसांवरही हल्लाबोल केलाय. तसंच राजेंद्र राऊत फितूर असल्याचं टीकास्त्र देखील जरांगे पाटलांनी डागलंय. दरम्यान यानंतर भाजपच्या प्रवीण दरेकरांनी जरांगे पाटलांवर पलटवार केलाय.
पाहा व्हिडीओ:-
आज मनोज जरांगेंना आव्हान देणारे याच राजेंद्र राऊतांनी काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. तसंच आंदोलन मागे घेण्यासाठीही विनंती केली होती. छगन भुजबळानंतर आता राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सामना रंगलाय. मराठा आरक्षणावरुन राजेंद्र राऊतांनी दिलेलं चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनीही स्विकारलंय. त्यामुळे या दोघांमधला वाद इथवरच न थांबता, आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.