Manoj Jarange | या विजयाचे श्रेय माझ्या मराठा बांधवांचे, अडचण आल्यास लढत राहील -मनोज जरांगे

Manoj Jarange | मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणारे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे या यशाचे शिल्पकार आहेत. पण त्यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या विजयाचे श्रेय मराठा समाजाला दिले आहे. भविष्यात काही अडचणी आल्या तरी समाजासाठी लढत राहण्याचा निर्धार पण त्यांनी व्यक्त केला.

Manoj Jarange | या विजयाचे श्रेय माझ्या मराठा बांधवांचे, अडचण आल्यास लढत राहील -मनोज जरांगे
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 1:56 PM

मुंबई | 27 January 2024 : मराठा समाजालाा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या लढ्याला मोठे यश आले. या लढ्याचे संघर्षयोद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील ओळखल्या जातात. मराठा आरक्षणासंबंधीत शासकीय आदेश आल्यानंतर जरांगे पाटील यांना या यशाचे शिल्पकार मानण्यात येत आहे. पण हा लढा माझ्या एकट्याचा नाही तर संपूर्ण मराठा समाजाचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आरक्षण मिळण्याचे श्रेय पूर्णपणे मराठा समाजाचे असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले. भविष्यात कोणत्याही अडचणी आल्या. जीआर संदर्भात असो वा समाजाविषयी इतक कोणती अडचण आली तर लढत राहण्याचे आश्वासन जरांगे पाटील यांनी दिले.

विजयाचा जल्लोष

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आरपारच्या लढ्याची घोषणा केली होती. मुंबईच्या वेळीवर त्यांनी तळ ठोकताच राज्य सरकारने युद्ध पातळीवर सर्व यंत्रणा हलवली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीला यश आले. त्यांनी सुचवलेले अनेक बदल राज्य सरकारने मान्य केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रात्रीतूनच यासंबंधीचा शासन आदेश, परिपत्रक काढण्यात आले. त्यात सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या. रात्री दोन वाजता त्याची प्रत त्यांना देण्यात आली. त्यामुळे वाशीमध्ये सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. अनेकांनी ही मराठा बांधवासाठी दिवाळी असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. सकाळपासूनच राज्यातील अनेक गावात फटाके फुटले. आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

विजयी सभा कुठे घेणार?

थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीत एकाच मंचावर येणार आहेत. याठिकाणी मुख्यमंत्री मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवतील. तसेच शासनाच्या भूमिकेची माहिती देतील. आता विजय कुठे साजरा करणार, विजयी सभा कुठे घेणार असे पत्रकारांनी विचारले असता. वाशीमध्ये जल्लोष झाल्यानंतर अंतरवाली सराटीत विजयी सभा घेणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. एकूणच या विजयामुळे मराठा समाजाचा आनंदाचे वातावरण आहे. आता थोड्याच वेळात होणऱ्या सभेत जरांगे पाटील या निर्णयाविषयी माहिती देतील.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.