Mansoon Session : पावसाळी अधिवेशनाच्या पीचवर कुणाची जोरदार बॅटिंग; सरकारकडून घोषणांचा पाऊस तर विरोधक घामटा काढणार

Legislative Assembly Session : यंदा महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. यामध्ये सरकार घोषणांचा पाऊस पाडेल. तर विरोधक विविध मुद्यांवरुन फटकेबाजी करतील.

Mansoon Session : पावसाळी अधिवेशनाच्या पीचवर कुणाची जोरदार बॅटिंग; सरकारकडून घोषणांचा पाऊस तर विरोधक घामटा काढणार
विधानसभेवर विरोधकांचे वादळ, तर सरकारकडून घोषणांचा पाऊस
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 9:59 AM

लोकसभा निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरणं बदलण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत. त्यातच आजपासून पावसाळी अधिवेशनाची नांदी सुरु होत आहे. यंदा महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पावसाळी अधिवेशनाच्या पीचवर दोन्ही पक्ष दमदार बॅटिंग करण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी हे विधानसभेसाठी दंडबैठका मारत आहेत. त्याचे पडसाद या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून पाहायला मिळतील.

घोषणांचा पाऊस

आज पासुन पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या घोषणा या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. या पावसाळी अधिवेशनात निवडणुका डोळ्यांसमोर घोषणांचा पाऊस होऊ शकतो. तर विरोधक अनेक मुद्यावरून आक्रमक होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

निवडणुका डोळ्यासमोर, कोण घेणार आघाडी

विधानसभा निवडणूक ही आता तोंडावर येऊन ठेपली आहे. नजीकच्या काळात विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी तर विधानसभेची अंदाजित तारीख पण जाहीर केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जय्यत तयारी सुरु केली आहे. विधानसभेसाठी बैठकांची सत्र सुरु आहे. दोन्ही गट जोर बैठका मारत आहे. लोकसभेतील मुसंडीने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर महायुती वचपा काढण्यासाठी रणनीती आखत आहे. त्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनाची पीच अत्यंत फायदेशीर राहील. त्याचा दोन्ही गट पुरेपुर वापर करतील. अनेक मुद्यांवर वातावरण तापेल, तर सरकार बाजू सावरण्यासाठी मोठ्या घोषणा करेल.

पावसाळी अधिवेशनातील विरोधकांचे मुद्दे

– शेतकरी कर्जमाफी – दुधाला कमी भाव – नीट परीक्षा रद्द – बोगस बियाणे – ज्यादा भावात बियाणे विक्री – बेरोजगारी – अटल सेतू भेगा – शेतकरीला मदत न करने – शेतकरीला पीक कर्ज न देने – कायदा सुव्यवस्था – पोलिस भरती रद्द – परीक्षा घोळ – पेपर फुटी – पुणे हिट अँड रन जामीन प्रकरण – महागाई सहीत इतर ही मुद्दे महत्त्वाचे असणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.