मराठा आमदारांना सोडणार नाही, मराठा मोर्चाची धमकी
मुंबई: बैठक रद्द झाल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने आज पत्रकार परिषद घेत सर्व आमदारांना गर्भित इशारा दिला. मराठा आमदारांना सोडणार नाही, आज न झालेली बैठक 26 नोव्हेंबरला होईल, असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आमदारांना इशारा दिला. मराठा क्रांती मोर्चाकडून 22 नोव्हेंबर म्हणजेच […]
मुंबई: बैठक रद्द झाल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने आज पत्रकार परिषद घेत सर्व आमदारांना गर्भित इशारा दिला. मराठा आमदारांना सोडणार नाही, आज न झालेली बैठक 26 नोव्हेंबरला होईल, असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आमदारांना इशारा दिला.
मराठा क्रांती मोर्चाकडून 22 नोव्हेंबर म्हणजेच आज आमदार परिषदेचं आयोजन केलं होतं. मात्र या परिषदेला आमदारांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे चिडलेल्या मराठा मोर्चाने आज पत्रकार परिषद घेत गर्भित इशारा दिला.
आबा पाटील म्हणाले, “आम्ही मराठा आमदारांना सोडणार नाही. अधिवेशन संपण्यापूर्वी सर्वपक्षीय आमदारांची बैठक होईलच. आज न झालेली बैठक 26 नोव्हेंबरला होईल. आम्हाला सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे. सरकारने आरक्षणासंदर्भातील संभ्रम दूर करावा. आम्ही सर्व पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आहे”
मंत्र्यांच्या वक्तव्याने संभ्रम – अजित पवार
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही सरकार मराठा आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप विधानसभेत केला.
अजित पवार म्हणाले, मराठा समाजात संभ्रमावस्था आहे. मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांनी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाबाबत वेगवेगळी स्टेटमेंट दिली. मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या की अहवाल स्वीकारला काही स्पष्ट नाही. सरकारच्या या वक्तव्यांमुळे संभ्रम होत आहे. 52 टक्क्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, असं अजित पवार म्हणाले.