अ‍ॅड. जयश्री पाटलांमुळे मराठा समाजाची बदनामी, बोलवता धनी सांगणार, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. (Maratha Kranti Morcha Jayashree Patil )

अ‍ॅड. जयश्री पाटलांमुळे मराठा समाजाची बदनामी, बोलवता धनी सांगणार, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
अॅड. जयश्री पाटील
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 8:36 AM

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात अ‍ॅड. जयश्री पाटील (Adv Jayashree Patil) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सीबीआय तपासाचा आदेश दिला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून संताप व्यक्त केला जात आहे. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. (Maratha Kranti Morcha alleges Adv Jayashree Patil defamed Maratha Society)

याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने परिपत्रक जारी करुन दिला आहे. सुप्रीम कोर्टात निकाल लागताच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा बोलवता धनी कोण, याचाही खुलासा करणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिलं होतं.

इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अ‍ॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती.

अ‍ॅड. जयश्री पाटील नेमकं काय म्हणाल्या?

अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचे तुमच्यावर वरदहस्त असाल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. भलेही तुम्ही माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. सरन्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय. अनिल देशमुख तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही, असं जयश्री पाटील निकालानंतर म्हणाल्या होत्या.  (Maratha Kranti Morcha alleges Adv Jayashree Patil defamed Maratha Society)

कोण आहेत जयश्री पाटील? (Who is Adv Jayashree Patil)

  • अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली
  • जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे
  • ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत .
  • जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलं
  • त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकं लिहिली आहेत

संबंधित बातम्या :

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

अनिल देशमुखप्रकरणात पहिल्यांदाच शरद पवारांचं नाव, अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या, भलेही तुम्ही मोठे मराठा नेते असाल

(Maratha Kranti Morcha alleges Adv Jayashree Patil defamed Maratha Society)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.