Maharashtra Mumbai Marathi News Live | जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त
Maratha Reservation Protest live news in Marathi : आज बधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023. देश, विदेश, राज्य, शहर, जिल्हे आणि तालुका स्तरावरील महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या विषयावरुन मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. मागच्या दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी संतप्त पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. हिंसक आंदोलन झाली. कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून मराठा आरक्षण तात्काळ देण्यात यावं, यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन पीण पिण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती आता थोडी बरी आहे. अन्न-पाणी सोडल्यामुळे आंदोलनाच्या सहाव्यादिवशी मनोज जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले होते. पण त्यानंतर मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पाणी पिण्यास सुरुवात केलीय. राज्यात जाळपोळ, तोडफोड अशा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
बुलढाण्यात बायोडिझेल पंपावर भीषण आग, ट्रक जळून खाक
बुलढाणा | बुलढाण्यात बायोडिझेल पंपावर आग लागलीय. आगीत ट्रक जळून खाक झालाय. पेट्रोल पंपवरील एका खोलीला सुद्धा आग लागलीय. खामगाव ते अकोला रस्त्यावरील कोलोरी फाट्याजवळ ही घटना घडली.
-
मराठा आंदोलकांनी सोलापूर-हैद्राबाद आणि सोलापूर-पुणे हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग रोखले
सोलापूर : मराठा समाजाच्या आंदोलकांनी टायर पेटवून सोलापूर-हैद्राबाद आणि सोलापूर-पुणे हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग रोखले आहेत. सोलापुरातील मार्केट यार्डजवळ मराठा बांधवांनी राष्ट्रीय महामार्ग रोखलाय. सोलापूर-हैद्राबाद महामार्ग रोखल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झालीय. राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने दोन्ही दिशेला लांबपर्यंत वाहतूक ठप्प झालीय.
-
-
Naresh Goyal | ईडीचा नरेश गोयल यांना मोठा झटका
मुंबई | एक मोठी बातमी समोर आली आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीने नरेश गोयल यांची 538 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने 550 कोटींच्या कॅनरा बँक घोटाळ्यात ही कारवाई केली आहे. ईडीने या प्रकरणात कालच आरोपपत्र दाखल केलं आहे.नरेश गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
-
Manoj Jarange Patil | पुरावे असूनही सरकार आरक्षण देत नाहीये, जरांगे पाटील यांची राज्य सरकारवर टीका
अंतरवाली सराटी | आरक्षण मिळेपर्यंत पाण्याता हात लावणार नाही, असं ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तसेच मी माघार घेणार नसल्याचंही जरांगे पाटील यांनी सांगितलंय. पुरावे असूनही सरकार आरक्षण देत नाहीये. तसेच राज्य सरकार जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करत आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांची राज्य सरकारवर टीका केली आहे.
-
Solapur Maratha Protest | सोलापूर शहरात मराठा समाजाच्या वतीने टायर जाळत रास्ता रोको आंदोलन
सोलापूर | मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणासाठी समाजबांधव हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. काही ठिकाणी तीव्र स्वरुपात आंदोलनं केली जात आहेत. सोलापूर शहरात मराठा समाजाच्या वतीने टायर जाळत रास्ता रोको आंदोलन केलं गेलंय. सोलापूर शहरातील सुपर बाजार समोर केले टायर जाळून रास्तारोको आंदोलन केलं गेलंय. एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
-
-
सोलापूरात मराठा समाजाचे आंदोलन सुरू
सोलापूर शहरात मराठा समाजाच्या वतीने टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. सोलापूर शहराबाहेर होणारे आंदोलन आता शहराच्या मध्यभागी सुरु आहे. सोलापूर शहरातील सुपर बाजारसमोर केले टायर जाळून रास्तारोको आंदोलन
-
मराठा क्रांती मोर्चाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
मराठा क्रांती मोर्चाने विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. राहुल नार्वेकरांना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केलीये. मराठा समाजाचा प्रश्न अधिवेशन घेवून सोडवण्याची मागणी यामध्ये करण्यात आलीये.
-
Pune News | पुण्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
पुण्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. आज तर चक्क गाढवाला खासदार आणि आमदार बनवले. मावळ तालुक्यातील कार्ला येथे हे आंदोलन पार करण्यात आले. मराठा समाजाचे खासदार आणि आमदार गाढव झालेत, असं या आंदोलनातून दाखवण्याचा प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाने केला
-
मराठा आरक्षणासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान
सर्वच पक्षाने विधिमंडळाने आणि मंत्रिमंडळाने एक मुखाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील त्यांच्या मागे भाजप पक्ष उभा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
-
दिल्लीत गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी
एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे दिल्लीतील दक्षिण द्वारका येथे एका घराला आग लागली. त्यात एकाच कुटुंबातील पाच जण भाजले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आणि दोन तासांत आग आटोक्यात आणण्यात आली. .
-
पंतप्रधान मोदी यांनी आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी भारतीय खेळाडूंची घेतली भेट
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम में एशियाई पैरा खेलों में भाग लेने वाले भारतीय एथलीटों के साथ मुलाकात की। pic.twitter.com/gS3Jas9zB3
— ANI_HindiNews (@AHindinews) November 1, 2023
-
वानखेडेवर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण
वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बीसीसीआय सचिव, खजिनदार यांच्यासह राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचने नेते शरद पवार उपस्थित होते. शिल्पकार प्रमोद काळे यांनी हा पुतळा साकारलेला आहे.
-
चीनने तैवान सीमेजवळ 43 लढाऊ विमाने पाठवली
तैवानने बुधवारी सांगितले की चीनने आपल्या सीमेजवळ 43 लढाऊ विमाने आणि सात नौदल जहाजे पाठवली आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, बुधवारी सकाळी 6 वाजता चीनने ही लढाऊ विमाने आणि नौदलाची जहाजे सीमेच्या बाजूने पाठवली.
-
महायुतीच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक
महायुतीच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी सांयकाळी 6 वाजता ही बैठक होत आहे. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील. भाजप, सेना, अजित पवार गटाचे आमदार या बैठकीला हजर असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला हजर असतील. अजित पवार हे पण बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे.
-
पुणे विद्यापीठात दोन गटात राडा
पुणे विद्यापीठात दोन गटात हाणामारी झाली. एसएफआय आणि एबीव्हीपी या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये वाद उफाळला. वाद टोकाला पोहचल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले. याप्रकरणात एबीव्हीपीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेचे चित्रीकरण पण समोर आले आहे.
-
ललित पाटील कोर्टात हजर
ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला पुणे पोलिसांनी न्यायालयात हजर केले. पुणे पोलिसांनी त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. ललितची इतर आरोपींसोबत एकत्र चौकशी करायची असल्याने पोलिसांनी त्याच्या कोठडीची विनंती केली आहे. आतापर्यंत याप्रकरणात 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 4 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
-
शहाजी बापू पाटील यांचा ताफा अडवला
शहाजी बापू पाटील यांचा ताफा मराठा आंदोलकांनी आडवला. यावेळी पाटील यांच्या चालकाने अंगावर वाहन घालवल्याचा आरोप करत आंदोलकांनी वाद घातला. यावेळी एक मराठा, लाख मराठा आणि सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना
भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात फडणवीस हजर होते. त्यानंतर आता निवडणुकीसंदर्भात भाजपच्या केंद्रीय समितीची आज बैठक होत आहे. त्या बैठकीला ते हजर राहतील.
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखरेने भरलेली पोती टाकली रस्त्यावर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन तसेच मराठा समाजाच्या आंदोलनामुळे इचलकरंजी जिल्ह्यामध्ये तणावाचे वातावरण झालं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक साखरेने भरलेल्या ट्रकमधील साखरेची पोती रस्त्यावर टाकलीत. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर साखर टाकल्यामुळे लाखो रुपयाची नुकसान साखर गोळा करण्यासाठी नागरिकांची धावपळ झालेली.
-
सरसकट कुणबी दाखले देताना जात पडताळणीची अट रद्द करा- शेलार बंधू
सरसकट कुणबी दाखले देताना जात पडताळणीची अट रद्द करा, अशी मागणी नाशिकच्या शेलार बंधूंची मराठा समाजाच्या वतीने शासनाकडे केली आहे. सरसकट प्रमाणपत्र ही तर संघर्षाची पहिली पायरी असून 5 वर्षांपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं शेलार बंधू म्हणाले.
-
आम्ही मनावर घेतलं तर ह्यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू- जरांगे पाटील
आम्ही मनावर घेतलं तर ह्यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू, सरकारला किती वेळ पाहिजे ते सांगावं. सरकार वातावरण बिघडवू पाहत आहे. काही झालं तरी आमरण उपोषण सोडणार नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
-
कोणताही पक्ष आपला नाही हे आता मराठ्यांना समजलं- मनोज जरांगेल-पाटील
शांततेचं युद्ध आता पेलवणार नाही, किती दिवसात आरक्षण देणार हे सांगा. सरसकट आरक्षण देणार की नाही इथे येऊन सांगा. गोरगरिबांवर गुन्हे दाखल करू नका. कोणताही पक्ष आपला नाही हे आता मराठ्यांना समजलं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
-
जरांगे पाटलांनी आंदोलन आणि उपोषण मागे घ्यावं- मुख्यमंत्री
सरकार दोन पातळ्यांवर काम करतंय. त्यासाठी तीन निवृत्त न्यायाधीशांची कमिटीदेखील गठीत केली आहे. मागासवर्ग आयोग युद्धपातळीवर काम करतंय. या सर्व मार्गांतून लवकरच मराठा समाजाला न्याय देणारा निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
-
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत कायदा-सुव्यवस्थेवर ठराव
राज्यात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहावी यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या बैठकीत सर्वपक्षीय ठराव करण्यात आला आहे, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
-
आरक्षणावर सर्वांचं एकमत परंतु थोडा वेळदेखील द्यावा लागेल- मुख्यमंत्री
मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत 32 नेते आणि लोकप्रतिनिधी होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे सर्वांचंच आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं असलं पाहिजे, यावरही सर्वांचं एकमत झालं. याला थोडा वेळदेखील द्यावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
-
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्नशील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. सर्व कायदेशीर बाबी तपासून टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार सर्व बाजूने प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करावं- सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहन
त्रुटी दूर करून आरक्षण दिलं पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करावं, यावर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालं आहे. टिकणारं आरक्षण देण्यावरही नेत्यांचं एकमत झालं आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाची सुरक्षा वाढवली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. नियमित बंदोबस्तपेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले आंदोलन बघता ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
-
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत कायदा-सुव्यवस्था ठरावावर नेत्यांचं एकमत
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे, यावर नेत्यांचं एकमत झालं आहे. गेल्या दोन तासांपासून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे. कायदा-सुव्यवस्था ठरावावर सर्व नेत्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.
-
प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जायला वेळ पण.. सुप्रिया सुळेंचा गृहमंत्र्यांवर निशाणा
प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जायला वेळ आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
-
संभाल के रहो… अजित पवार गटाला सुप्रिया सुळेंचा इशारा
भाजप एकनाथ शिंदे यांना धोका देत आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला विनंती आहे की, कधी एका ताटात जेवलोय आपण असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपापसासून संभाळून राहण्याच इशारा दिला आहे.
-
राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळे
राज्यातील सरकार असंवेदनशील असून राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, सुप्रिया सुळे यांनी मोठी मागणी केली आहे.
-
कायद्याची बाजू सर्वांनी समजून घेतली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
कायद्याची बाजू सर्वांनी समजून घेतली पाहिजे, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका व्यक्त केली.
-
नेत्यांच्या घरावर हल्ले झाले, पोलिसांनी भूमिका घेतली पाहिजे – जयंत पाटील
राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, असे सर्वपक्षीय नेत्यांचं मत असून नेत्यांच्या घरावर हल्ले झाले, पोलिसांनी भूमिका घेतली पाहिजे, अशी भूमिका जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेतली
-
आक्रमक सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी करणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात
-
मंत्रालयाबाहेर सर्वपक्षीय आमदार आक्रमक
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी करत मंत्रालयाबाहेर सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी मंत्रालयाला ठोकले टाळे
-
आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत – मुख्यमंत्री शिंदे
आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. तर त्रुटी काढून आरक्षण देऊ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे. आणि त्याची तारीख लवकरच मिळणार आहे.
-
राज्याने मिळून आरक्षणावर तोडगा काढावा – विजय वडेट्टीवार
मराठा आरक्षणावर केंद्र काही मदत करणार का? असा सवाल करत केंद्र आणि राज्याने मिळून आरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
-
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली – अंबादास दानवे
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, असे म्हणत राज्याचे विरोध पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
-
सर्वपक्षीय बैठकीत दोन्ही विरोधी पक्षनेते आक्रमक
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार या दोन्ही विरोधी पक्षनेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर आरक्षणावर राज्याने केंद्राशी संपर्क केलाय का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
-
त्रुटी काढून आम्ही मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडण्यास सुरूवात केली आहे. यावेळी त्यांनी त्रुटी काढून आम्ही मराठा आरक्षण देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली
-
मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या – बच्चू कडू
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या अशी मागणी केल्यानंतर याला पाठिंबा दर्शवत मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले दिले पाहिजे, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी सरकारकडे केली आहे.
-
जरांगे पाटील यांचं आंदोलन हातळण्यात सरकार कमी पडंल – अशोक चव्हाण
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हातळण्यात सरकार कमी पडल्याची टीका करत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
-
मराठा आरक्षणावर केंद्राने हस्तक्षेप करावा – अशोक चव्हाण
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी मराठा आरक्षणावर केंद्राने हस्तक्षेप करावा, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
-
Maratha Arakshan | आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार आक्रमक
मंत्रालयाबाहेर सर्वपक्षीय आमदारांचं आंदोलन. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार आक्रमक. आमदारांकडून मंत्रालयाला टाळे लावण्यात आले होते.
-
All Party Meet | मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस प्रारंभ
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनिल प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉ प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे, आदी उपस्थित आहेत. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित .
-
CM Eknath Shinde | सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची भूमिका
क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे. त्रुटी काढून आम्ही आरक्षण देऊ. सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची भूमिका.
-
Pune | स्वारगेट चौकात आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्वारगेट चौकात आंदोलन. मराठा क्रांती मोर्चा आंदोलक आक्रमक
-
Ashok Chavan | जरांगेचं आंदोलन हाताळण्यात सरकार कमी पडलं
जरांगेच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढा. सर्वपक्षीयांनी शांततेचं आवाहन करावं. जरांगेचं आंदोलन हाताळण्यात सरकार कमी पडलं. मराठा आरक्षणावर केंद्राने हस्तक्षेप करावा. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत अशोक चव्हाणांची भूमिका.
-
Dharashiv | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलआंदोलन, टायर जाळून आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी घेतल्या तलावात उड्या, जलआंदोलन सुरु तर टायर जाळून आंदोलन. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पन्हाळवाडी येथील आंदोलक आक्रमक. जांब -मात्रेवाडी मध्यम प्रकल्पामध्ये जल आंदोलन केले जाणार. धाराशिव तालुक्यातील बामणी येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन
-
आरक्षणाच्या मुद्यावरून आमदार आक्रमक, मंत्रालयाबाहेर आमदारांचं आंदोलन
आरक्षणाच्या मुद्यावरून आमदार आक्रमक झाले असून मंत्रालयाबाहेर सर्वपक्षीय आमदारांतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आमदारांतर्फे करण्यात येत आहे.
-
नाशिक – येवल्यातील रास्ते सुरेगावमध्ये मराठा संघटनेचं आंदोलन
नाशिकच्या येवला तालुक्यातीलल रास्ते सुरेगावमध्ये मराठा संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत सरकारचा निषेध केला. दोन्ही बाजूंची वाहतूक झाली ठप्प.
-
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीसाठी नेते येण्यास सुरूवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, नाना पटोले यांच्यासह अनेक नेते ‘सह्याद्री’वर दाखल झाले आहेत.
थोड्याच वेळात या बैठकीस सुरूवात होणार असून राज्यातील सद्यपरिस्थितीवर त्यामध्ये चर्चा होणार आहे.
-
भाजप दिशाभूल करण्याचे काम करत आहे, महाराष्ट्र जळतोय यातून मार्ग निघाला पाहिजे – नाना पटोले
आज सर्वपक्षीय बैठक होत आहे, त्या बैठकीला मी जातोय. हे सरकारला उशीरा आलेलं शहाणपण आहे. महाराष्ट्र जळतोय यातून मार्ग काढला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही बैठकीला जातोय,असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
-
महाराष्ट्रातले एक फूल, दोन हाफ काडीखोर – संजय राऊतांचा हल्लाबोल
महाराष्ट्रातले एक फूल, दोन हाफ काडीखोर आहेत, असे टीकास्त्र सोडत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
-
सूडाच्या भावनेतून शिंदेंनी ठाकरे गटाला बोलावलं नाही – संजय राऊत
सूडाच्या भावनेतून शिंदेंनी ठाकरे गटाला बोलावलं नाही. आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल पण आरक्षणाचा प्रश्न सोडवा. असे संजय राऊत म्हणाले.
-
सर्वपक्षीय बैठकीचं अनेक ऐऱ्यागैऱ्यांना आमंत्रण – संजय राऊत
सर्वपक्षीय बैठकीचं अनेक ऐऱ्यागैऱ्यांना आमंत्रण पण या बैठकीला शिंदेंनी ठाकरे गटाला बोलावलं नाही, यातून मुख्यमंत्र्यांची संकुचित वृत्ती दिसून येते अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
Live Update : छगन भुजबळ यांच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
छगन भुजबळ यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. भुजबळ फार्म परिसराजवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईपाठोपाठ भुजबळांच्या नाशिकच्या घराला देखील पोलिसांचा गराडा… मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळत असल्याने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
-
Live Update : मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागतंय – हसन मुश्रीफ
मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागतंय.. असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. तोडफोड, जाळपोळीमुळे मराठा समाजाची सहानुभूती कमी होतं आहे… असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत…
-
Live Update : सरसकट आरक्षण द्या, अन्यथा आज संध्याकाळपासून पाणी बंद करणार – जरांगे पाटील
सरसकट आरक्षण द्या, अन्यथा आज संध्याकाळपासून पाणी बंद करणार… असा इशार जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्याचा डाव असू शकतो… असं देखील जरांगे पाटील म्हणाले…
-
Live Update : आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हाटत नाही – जरांगे पाटील
आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हाटत नाही. अर्धवट आरक्षण आम्ही घेत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मराठा मागे हाटणार नाही. नेट बंद करा काहीही करा… तुमच्या नेटपेक्षा मराठी हुशार झाला आहे…असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे…
-
Live Update : तब्बल ३६ तासानंतर बीड जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल
तब्बल ३६ तासानंतर बीड जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. बाजापपेठेसह सर्व कार्यालय आज सुरु राहणार आहे. इंटरनेट सेवा मात्र अनिश्चिक काळापर्यंत बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
-
Live Update : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, जाळपोळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात
नवले ब्रिज जाळपोळ प्रकरण सध्या चर्चेत आहे. जाळपोळ प्रकरणी पुण्यात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये 10 जणांसह 400 अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी मंगळवारी दुपारी नवले ब्रिजवर आंदोलन करण्यात आलं होतं. याच प्रकरणी आता पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात दाखल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
Live Update : मुंबईतील बैठकीसंदर्भात मोठी बातमी, बैठकीचं शरद पवारांना निमंत्रण
मुंबईतील बैठकीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. आज मुंबईत सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीचं शरद पवार यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. दोन छत्रपतींना देखील बैठकीच निमंत्रण आहे. बैठकीचं ३३ जणांना निमंत्रण देण्यात आलं आहे
-
पुण्यात यंत्रणा अलर्ट मोडवर
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तर, लोकप्रतिनिधींच्या निवासस्थान परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तर नागरिकाची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.
-
मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या सरपंचाचा राजीनामा
मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या सरपंचाने राजीनामा दिला आहे. माढा तालुक्यातील वडाचीवाडी गावाच्या सरपंचाने आपला राजीनामा सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाकडे हा राजिनामा देण्यात आला. तर आमदार, खासदारांनीही राजिनामा देण्याची यावेळी मागणी करण्यात आली आहे. -
पुणे जिल्ह्यात १२ हजार २९४ जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप
पुणे जिल्ह्यात १२ हजार २९४ जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे. १ जानेवारी २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या काळात सुमारे १२ हजार ९११ अर्ज आले होते. महसुली पुरावे तपासून त्यातील १२ हजार २९४ जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. एकूण अर्जांच्या तुलनेत ९६ टक्के प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. उर्वरित ४६० अर्ज प्रलंबित असून अर्जदारांनी वंशावळ पुरावे सादर केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
-
सकल मराठा समाजाची नाशिकमध्ये तातडीची बैठक
सकल मराठा समाजाची नाशिकमध्ये आज तातडीची बैठक होणार आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील बांधवांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बैठक होणार आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे.
-
बीड जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल
तोडफोड आणि जाळपोळीनंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. 36 तासात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याने संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. पण जमावबंदीचा आदेश मात्र कायम राहणार आहे. 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
-
Maratha Reservation | आज परभणी जिल्हा बंदची हाक
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज परत परभणी जिल्हा बंदची हाक. मराठा समाजाकडून बंदचा निर्णय. व्यापारी प्रतिष्ठान राहणार बंद, व्यापारी संघटनांनी दिलाय बंदला पाठिंबा. शेतमाल वाहतूक असणार बंद. काल एक दोन किरकोळ दगडफेकीच्या प्रकारानंतर पोलीस ऍक्शन मोड वरती आहेत
-
Maratha Reservation | आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद. बाजार समितीचे व्यापारी, आडते आणि शेतकऱ्यांचा बंदचा निर्णय. बाजार समितीत शुकशुकाट पाहायला मिळतोय,
-
Maratha Reservation | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरा बैठक
रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दीड तास बैठक झाली. बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे होते उपस्थित. वर्षा निवासस्थानीची बैठक मध्यरात्री संपली. मराठा आंदोलन संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती.
-
Maratha Reservation protest | धाराशिवमध्ये आज दुसऱ्या दिवशीही संचारबंदी आदेश लागू
धाराशिव जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही संचारबंदी आदेश लागू असणार, स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात. शाळा, बस, बाजारपेठ बंद असणार. शाळेच्या परीक्षा पुढे ढकलल्या. 450 बसच्या 1 हजार 450 बस फेऱ्या रद्द, एसटी मंडळाला 50 लाखाचा फटका. धाराशिव येथील संपूर्ण बसंसेवा बंद. आक्रमक आंदोलक रास्ता रोको, बस फोडणाऱ्या जवळपास 180 आंदोलकांवर गुन्हे दाखल.
Published On - Nov 01,2023 7:26 AM