“माझी अटक बेकायदेशीर”, केतकी चितळेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

केतकी चितळेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही दिवसांआधी तिला अटक झाली ही अटक झा बेकायदेशीर असल्याचा तिचा दावा आहे. तसा उल्लेख तिने या याचिकेत केला आहे

माझी अटक बेकायदेशीर, केतकी चितळेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 11:32 AM

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली. सध्या ती तळोजा जेलमध्ये आहे. पण आपली झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत तिने मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली आहे.

केतकीची उच्च न्यायालयात धाव

केतकी चितळेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही दिवसांआधी तिला अटक झाली ही अटक झा बेकायदेशीर असल्याचा तिचा दावा आहे. तसा उल्लेख तिने या याचिकेत केला आहे.

केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट

केतकी चितळे हिने 13 मेला एक कविता आपल्या फेसबुकवर शेअर केली होती. नितीन भावे लिखित ही कविता केतकीने शेअर करताच ती प्रकाश झोतात आली. ही कविता शरद पवार यांच्यावर टीका करणारी होती. ही फक्त टीका नव्हती तर आक्षेपार्ह भाषेत यात पवारांच्या शारिरिक व्यंगावर भाष्य करण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

केतकीने शेअर केलेली आक्षेपार्ह कविता

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll -Advocate Nitin Bhave

या कवितेनंतर केतकीवर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक क्षेत्रातील जाणकारांनी केतकीच्या या पोस्टवर आक्षेप घेतला. तिच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. अन् तिला अखेर अटक झाली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.