AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रावर वीज संकटाचे ढग? शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक;लोडशेडिंगचा फटका बसणार

कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्यात लोड शेडिंगसारखी स्थिती ओढावू शकते, अशी भीती निर्माण व्यक्त केली जाते आहे. राज्यात अवघे दोन ते तीन पुरेल इतका कोळशाचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रावर वीज संकटाचे ढग? शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक;लोडशेडिंगचा फटका बसणार
राज्यावर वीज संकटाचे सावटImage Credit source: TV9
| Updated on: Apr 07, 2022 | 11:22 PM
Share

मुंबईः राज्यातील वीज टंचाईबाबत (Power shortage) शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहे. या बैठकीत राज्यातील वीजप्रश्नावर (Electricity) काय चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कोळसा (Coal) कमी उपलब्ध असल्यानं राज्यावर वीज संकट ओढावू शकतं अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. अवघे काही दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वीजप्रश्नाबाबत होणाऱ्या या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचंय. कोळशाच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रावर वीजसंकटाचे ढग घोंगावत आहेत. वाढलेल्या तापमानात आता महाराष्ट्रात वीज संकटामुळे पुन्हा लोडशेडिंगला सामोरं जावं लागणार काही काय? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.

लोडशेडिंगची भीती

कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्यात लोड शेडिंगसारखी स्थिती ओढावू शकते, अशी भीती निर्माण व्यक्त केली जाते आहे. राज्यात अवघे दोन ते तीन पुरेल इतका कोळशाचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे कोयाना धरणातील पाणीसाठा 17 ते 18 दिवस पुरेल इतकाच वीजनिर्मितीसाठी उपलब्ध आहे, असंही सांगितलं जातंय.

उपाय काय?

कोळशाच्या तुटवड्यामुळे आता राज्य सरकार खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे.

राज्याला विजेची इतकी गरज

महाराष्ट्रात दररोज 20 ते 22 हजार मेगावॅट इतक्या विजेचा गरज भासते. अशातच आता राज्याच्यी वीज मागणीत वाढ झाली आहे. राज्याच्या विजेची मागणी आता 28 हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. दोन ते तीन दिवसांत हीच मागणी 30 हजार मेगावॅटपर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तवली जातेय.

संबंधित बातम्या 

Mns Viabhav Khedekar : मनसेला दुसरा झटका कोकणातून, नगराध्यक्ष वैभव खेडेकर अपात्र, कदमांचे आरोप नडले

संजय बियाणी हत्याकांडांची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा नियमित आढावा घेणार

ठाण्यात 12 एप्रिलला ‘राज’गर्जना ! पोलिसांचं एक पाऊल मागे, डॉ. मुस रस्त्यावरच सभेला परवानगी

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.