Mega Block | ठाणे-दिवा नव्या मार्गिकेच्या कामासाठी 72 तासांचा मेगाब्लॉक, 350 लोकल रद्द
रेल्वे विभागाने येत्या 4 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपासून ते 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत तब्बल 72 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वेचं वेळापत्रक बदललं आहे. या ब्लॉकमुळे 350 लोकल रद्द होणार आहेत. तसेच 117 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही गाड्यांचा पनवेल येथे प्रवास समाप्त करण्यात येणार आहे.
मुंबई : येत्या 8 फेब्रुवारीपासून ठाणे-दिवा ही सहावी रेल्वे मार्गिका सुरु होणार आहे. या मार्गिकेवर कट आणि कनेक्शन अशा पायाभूत सुविधांचे काम केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वे विभागाने येत्या 4 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपासून ते 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत तब्बल 72 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वेचं वेळापत्रक बदललं आहे. या ब्लॉकमुळे 350 लोकल रद्द होणार आहेत. तसेच 117 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही गाड्यांचा पनवेल येथे प्रवास समाप्त करण्यात येणार आहे. 4 फेब्रुवारीच्या रात्री 11.10 वाजल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन निघणाऱ्या आणि ठाण्याला पोहोचणाऱ्या डाऊन मेल-एक्स्प्रेस गाड्या ब्लॉक पूर्ण होईपर्यंत कल्याम स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 या मार्गावर वळवण्यात येतील.
लोकलच्या वेळापत्रकात कोणते बदल होणार ?
तसेच चार फेब्रुवारीच्या रात्री 11.10 वाजल्यापासून सहा फेब्रुवारीच्या पहाटे चार वाजेपर्यंत कल्याण येथून सुटमाऱ्या अप मेल एक्स्प्रेस आणि अप जलद उपनगरीय लोकल कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच या गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. 6 फेब्रुवारीपासून अप जलद गाड्या कळवा प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि नवीन बोगदा एक मार्गे नव्याने तयार केलेल्या जलद मार्गावर चालवल्या जातील.
इतर बातम्या :