आज प्रवास करण्यापूर्वी बातमी वाचा, कुठे आहे मेगा ब्लॉक, कोणत्या एक्स्प्रेस रद्द ?

मुंबईत आज मेगा ब्लॉक आहे. यामुळे काही लोकल रद्द केल्या आहेत तर काही उशिराने धावणार आहेत. तसेच काही एक्स्प्रेस गाड्याही रद्द केल्या आहेत.

आज प्रवास करण्यापूर्वी बातमी वाचा, कुठे आहे मेगा ब्लॉक, कोणत्या एक्स्प्रेस रद्द ?
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 8:20 AM

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway), पश्चिम रेल्वे अन् हर्बल रेल्वेने रविवारी विविध कामांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घोषित केला आहे. या मेगाब्लॉकमुळे काही मार्गावरील लोकल (Local) रद्द करण्यात आल्या आहेत. काही लोकल उशिराने धावणार आहेत. तसेच काही एक्स्प्रेस गाड्याही रद्द केल्या आहेत. यामुळे आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुठे फिरण्यासाठी बाहेर जात असाल, तर सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.त्यानंतरच आपले नियोजन करा.

ठाणे ते कल्याण पाचवा-सहावा मार्ग आणि कुर्ला ते वाशी या मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. प्रगती एक्स्प्रेससह अन्य मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत.काही एक्स्प्रेस रद्दही केल्या आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वे –

हे सुद्धा वाचा

स्थानक : ठाणे – कल्याण मार्ग : पाचवा आणि सहावा वेळ : सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत

हार्बर रेल्वे –

स्थानक : कुर्ला – वाशी मार्ग : अप आणि डाऊन वेळ : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१०पर्यंत

पश्चिम रेल्वे : सकाळी ब्लाॅक नाही

स्थानक : बोरिवली ते भाईंदर मार्ग : अप आणि डाऊन जलद वेळ : शनिवार रात्री ११.४५ ते रविवार पहाटे ४.४५ संपणार

या गाड्या रद्द

नागपूर-अहमदाबाद, मुंबई भुसावळ आणि सुरत-अमरावती एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली आहे.

उधना रेल्वे स्टेशनवर मेगा ब्लॉक

सुरतजवळील उधना रेल्वे स्टेशनवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. ३ ते ६ मार्च दरम्यान या गाड्या रद्द आहेत. यामुळे प्रवाश्यांनी प्रवास करण्यापूर्वी चौकशी करुन नियोजन करावे.

  1.  12935 बांद्रा टर्मिनस-सूरत इंटरसिटी 5 मार्च, 2023 रद्द
  2. 12933 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद कर्णावती एक्सप्रेस 5 मार्च, 2023 रद्द
  3. 12921 मुंबई सेंट्रल-सूरत की फ्लाइंग रानी 5 मार्च, 2023 रोजी रद्द
  4. बोरीवली-नंदुरबार एक्सप्रेस 4 और 5 मार्च, 2023 रद्द
  5. 11127 भुसावल-कटनी एक्सप्रेस 6 मार्च, 2023 रद्द
  6. 22138 अहमदाबाद-नागपुर प्रेरणा एक्सप्रेस 5 मार्च, 2023 रोजी रद्द
  7. 12922 सूरत-मुंबई सेंट्रल फ्लाइंग रानी एक्सप्रेस 5 मार्च रोजी रद्द केली आहे.
  8. 12934 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेस 5 मार्च, 2023 रद्द
  9. 20926 अमरावती-सूरत सुपरफास्ट एक्सप्रेस 6 मार्च, 2023 रद्द
  10. 12936 सूरत-मुंबई सेंट्रल इंटरसिटी एक्सप्रेस 5 मार्च, 2023 रद्द
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.