Mumbai Megablock: मुंबईकरांनो, रविवारचं लोकलचं वेळापत्रक बघितलं का? 8 तासाचा मेगाब्लॉक
विविध तांत्रिक कामांसाठी उद्या रविवारी मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे (thane) ते कल्याणदरम्यान दोनही जलद मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक आठ तासांचा असणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी उद्या रविवारी मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे (thane) ते कल्याणदरम्यान दोनही जलद मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक आठ तासांचा असणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. या मेगा ब्लॉकमुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून, गाड्या उशिराने धावणार आहेत. या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या स्थानकांदरम्यान दोनच मार्ग उपलब्ध असल्याने लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशराने धावतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
बेलापूर ते पनवेल दरम्यानच्या लोकल रद्द
कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवरही मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉकमुळे सीएसएमटी ते वाशी आणि बेलापूर ते पनवेल दरम्यानच्या लोकल सकाळी 11: 30 ते दुपारी 4:10 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान ठाणे ते कल्याणदरम्यान जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही लोकल या उशिराने धावतील तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मेगा ब्लॉकदरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर देखील उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक पाच तासांचा असणार आहे. सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत सांतक्रुझ ते गोरेगाव दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येईल. अप आणि डाऊन धिम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात रेल्वे रुळाच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
VIDEO | स्टेशनवर किसिंगचा कहर, मुंबईतल्या त्या जोडप्याची जोरदार चर्चा, बिचाऱ्यांवर जीआरपीकडून गुन्हा
Video | मंत्रिपदाने फरक पडत नाही, …तर उद्याच राजीनामा देतो; बच्चू कडू शेतकऱ्यांवर संतापले
अंबरनाथ बदलापुरात घरांच्या किमती वाढणार, बांधकाम व्यावसायिक संघटनेचा निर्णय