Mhada Home : आता म्हाडाचं घरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, अत्यल्प उत्पन्न मर्यादेत दुप्पट वाढ, इतरही उत्पन्न मर्यादेत वाढ, वाचा सविस्तर

अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे उत्पन्न गटात बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत प्रत्येक गटासाठी मासिक उत्पन्न मर्यादा किती होती? तसेच आता नवी मर्यादा किती असेल त्यावरही आपण नजर टाकणार आहोत.

Mhada Home : आता म्हाडाचं घरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, अत्यल्प उत्पन्न मर्यादेत दुप्पट वाढ, इतरही उत्पन्न मर्यादेत वाढ, वाचा सविस्तर
आता म्हाडाचं घरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, अत्यल्प उत्पन्न मर्यादेत दुप्पट वाढ, इतरही उत्पन्न मर्यादेत वाढ
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 7:47 PM

मुंबई : मुंबईला आपण सर्वजण स्वप्नांची नगरी (Home In Mumbai) म्हणून ओळखतो. ही स्वप्नांची नगरी अनेकांची स्पप्न पूर्ण करते. याच मुंबईत आपलेही एखादे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. हे घर घेण्यासाठी अनेकजण आपल्या आयुष्याची कमाई लावतात. सर्वसामान्याला घर घेण्यासाठी काहीसा आर्थिक दिलासा मिळावा यासाठी म्हाडासारख्या (Mhada) संस्था आहेत. मात्र आता मुंबईत घर घेणं आणखी कठीण आणि खर्चिक होऊन बसलंय. कारण याच म्हाडाने आता खर खरेदीसाठीची अत्यल्प मर्यादा (Income) वाढवली आहे. तसेच इतर निकषही बरेच बदलले आहेत. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे उत्पन्न गटात बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत प्रत्येक गटासाठी मासिक उत्पन्न मर्यादा किती होती? तसेच आता नवी मर्यादा किती असेल त्यावरही आपण नजर टाकणार आहोत.

जुनी उत्पन्न मर्यादा

अत्यल्प गट – प्रतिमाह 25, 000 रुपयांपर्यंत अल्प गट – प्रतिमाह 25,000 ते 50,000 रुपयांपर्यंत मध्यम गट – प्रतिमाह 50,001 ते 75000 रुपयांपर्यंत उच्च गट – प्रतिमाह 75,001 रुपयांच्या पुढे

नव्या बदलानुसार प्रत्येक गटासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती?

अत्यल्प गट – वार्षिक 6,00,000 रुपये अल्प गट – वार्षिक 6,00,001 ते 9,00,00 रुपये मध्यम गट – वार्षिक 9,00,001 ते 12,00,000 रुपये उच्च गट – वार्षिक 12,00,001 ते 18,00,000 रुपये

हे सुद्धा वाचा

या निकषानुसारच अर्ज असणे आवश्यक

म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत अखेर वाढ करण्यात आल्याचा बुधवारी गृहनिर्माण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे. या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. या उत्पन्न मर्यादेनुसार इच्छुकांना सोडतीत अर्ज भरत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येते. उत्पन्न मर्यादेनुसारच अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे, असेही सांगण्यात आले आहे.

घरं आता फक्त श्रीमंतांसाठी?

मुंबई आणि मुंबईलगत म्हाडाचे अनेक प्रकल्प सध्या सुरू आहेत. त्यामुळे लवकरच म्हाडाच्या घरासाठी मोठी सोडत निघणार आहे. मात्र यावेळी घर घेतना घाम निघणार आहे. एवढं मात्र या नव्या आकडेवारीतून स्पष्ट जाणवत आहे. ज्यांनी जुन्या उत्पन्न मर्यादेनुसार तयारी केली. त्यांचं घर घेण्याचं स्पप्न क्षणात भंग होऊ शकतं. त्यामुळे आता सर्वसामन्यांकडून या नव्या निर्णयाला विरोध होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही वाढवलेली उत्पन्न मर्यादा पाहता म्हाडाची घरं आता फक्त श्रीमंतांसाठी आहेत का? असा सवालही आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयात काही बदल होणार की याच निकषानुसार घर घ्यावे लागणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...