Mhada Lottery 2023 Mumbai : बोला मुंबईत कुठं घर हवंय? तुम्ही म्हणाल तिथे घर मिळेल; म्हाडाची जम्बो सोडत; पटापट नोंदणी करा

mhada lottery 2023 mumbai news : म्हाडाच्या घराच्या सोडतीची वाट पाहणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. म्हाडा 4083 घरांची सोडत काढणार आहे. येत्या 22 मे पासून या घरांची नोंदणी करता येणार आहे.

Mhada Lottery 2023 Mumbai : बोला मुंबईत कुठं घर हवंय? तुम्ही म्हणाल तिथे घर मिळेल; म्हाडाची जम्बो सोडत; पटापट नोंदणी करा
mhada house in mumbaiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 1:42 PM

मुंबई : मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येकजण थोडी थोडी रक्कम साठवत असतो. जेव्हा घर घ्यायची वेळ येते तेव्हा आयुष्याची संपूर्ण पुंजी बाहेर काढली जाते. पण घराची किंमतच एवढी महाग असते की घर घेणं खिशाला परवडत नाही. त्यामुळे अनेकांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. मात्र, गेल्या काही वर्षापासून सामान्य मुंबईकराचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत आहे. म्हाडाकडून मुंबईकरांना स्वस्तात आणि चांगली घरे दिली जात आहे. यावेळीही म्हाडाने घरांची सोडत काढली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 4 हजार 83 घरांची सोडत म्हाडा काढणार असून आता सामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

म्हाडा विविध उत्पन्न गटासाठी 4083 घरांची सोडत काढणार आहे. येत्या 22 मे पासून या घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरणे आणि स्वीकृतीला 22 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घरांची सोडत काढली जाणार आहे. 18 जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात ही सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

थोडक्यात महत्त्वाचे

* एकूण सदनिका 4083 * अत्यल्प – 2790 * अल्प – 1034 *  मध्यम – 139 *  उच्च – 120

अर्ज कुठे भराल?

https://housing.mhada.gov.in https://www.mhada.gov.in

<< याच संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांनी अर्ज भरण्याकरिता याच संकेत स्थळांचा वापर करावा, असे आवाहन, मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.

>> तसेच ॲण्ड्रोइड मोबाइल फोनवर प्ले स्टोर आणि ॲपल मोबाइल फोनवर APP स्टोरमध्ये सोडत प्रणालीचे मोबाइल ॲप्लिकेशन MHADA HOUSING LOTTERY SYSTEM  इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अर्ज नोंदणीची अशी आहे प्रक्रिया

  1. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता सर्वप्रथम अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
  2. नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना अर्ज सादर करण्याकरिता 26 जून, 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  3. अर्जासोबत आवश्यक असलेली उत्पन्न गट निहाय आवश्यक असलेली अनामत रक्कम क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन भरण्यासाठी 26 जून रोजी रात्री 11. 59 वाजेपर्यंत मुदत असेल.
  4. तसेच अनामत रकमेचा भरणा बँकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करण्यासाठी 28 जून 223 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.
  5. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 04 जुलै, 2023 रोजी दुपारी 3 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in आणि https://www.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाईल.
  6. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे आणि हरकती 7 जुलै दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार आहेत
  7. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 12 जुलै रोजी दुपारी 3 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

किती घरे? कुठे कुठे? कोणत्या गटासाठी?

  1. मुंबई मंडळाच्या सोडतीत एकूण 4083 घरांचा समावेश आहे
  2. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2790, अल्प उत्पन्न गटासाठी 1034, मध्यम उत्पन्न गटासाठी 139 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 120 घरे आहेत
  3. सोडतीमधील अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील 1947, अ‍ॅन्टॉप हिलमधील 417, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील 424 अशी एकूण 2788 घरांचा समावेश आहे.
  4. अल्प उत्पन्न गटात एकूण 1034 घरे आहेत
  5. गोरेगावमधील डोंगराळ भागात 736 घरांचा समावेश आहे
  6. उर्वरित घरे लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर – गोरेगाव पश्चिम, डीएन नगर -अंधेरी, पंत नगर -घाटकोपर, कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीर नगर कांदिवली, जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड आदी ठिकाणची आहेत.
  7. मध्यम उत्पन्न गटासाठी मंडळाने 140 घरे उपलब्ध करून दिल्या आहेत. ही घरे उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकार नगर चेंबूर, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबूर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोप कांदिवली येथे आहेत.
  8. उच्च उत्पन्न गटासाठी 120 घरांचा समावेश असून ही घरे जुहू अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथे आहेत.

उत्पन्नाची मर्यादा काय?

>> अत्यल्प उत्पन्न गटाकरिता (EWS) वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे.

>> अल्प उत्पन्न गटाकरिता (LIG) वार्षिक 9 लाख रुपयापर्यंत उत्पन्न आवश्यक आहे.

>> मध्यम उत्पन्न गटाकरिता (MIG) 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे.

>> उच्च उत्पन्न गटाकरिता (HIG) कमाल उत्पन्न मर्यादा नाही.

अनुदान किती?

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांची किंमत ही केंद्र आणि राज्य शासनाचे प्रती घरे एकूण अनुदान 2.50 रुपये वजा करून निश्चित करण्यात आली आहे.

अडचणी आल्यास संपर्क साधा

अर्ज करताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींसाठी मार्गदर्शनासाठी 022-69468100 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.