“अर्थसंकल्पातही ज्यांना फक्त राजकारण दिसते त्यांना काय बोलणार”; अर्थसंकल्पावरून टीका करणाऱ्यांना या शिंदे गटाने सुनावले

शहरांचा विकास होण्यासाठी आणि तो योग्य प्रकारे करण्यासाठी महानगरपालिका पुढील काळात स्वतः चे पैसे स्वतः उभे करू शकते ही योजना आखण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातही ज्यांना फक्त राजकारण दिसते त्यांना काय बोलणार; अर्थसंकल्पावरून टीका करणाऱ्यांना या शिंदे गटाने सुनावले
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 10:36 PM

मुंबईः केंद्र सरकारकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा अर्थसंकल्प किती फायदेशीर आहे हे सांगितले तर विरोधकांनी या अर्थसंकल्पामध्ये फक्त घोषणांचा पाऊस असल्याचे म्हटले आहे. तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून या अर्थसंकल्पाचे समर्थन आणि फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या अर्थसंकल्पाविषयी बोलताना शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी हा अर्थसंकल्प देशातील तरुणांईसाठी किती महत्वाचा आहे ते सांगत, यामुळे युवकांचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

युवकांबरोबरच शेती, कामगार, नोकरदार आणि शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टींची तरतूद केली गेली आहे. त्याचा फायदा देशातील अनेक बेरोजगार युवकांसाठी होणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

ज्या प्रकारे देशातील युवकांसाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर ठरणार आहे त्याच प्रमाणे त्याचा फायदा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीसुद्धा फायदेशीर ठरणार आहे.

भारत हा तरुण देश असताना जगाला प्रशिक्षित असे युवक देणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठीसुद्धा स्वतंत्र व्यवस्था अर्थसंकल्पात केली गेली आहे. त्यामुळे देशातील युवकांनाच त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले आहे.

सांडपाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र योजना आखली आहे. गेल्या कित्येक वर्षात ड्रेनेजमध्ये अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांचा विचार करून मॅनहोलचे मशीनहोलमध्ये रूपांतर करण्यासाठी एक नवी योजना आखण्यात आली आहे.

ज्या प्रमाणे देशातील नागरिकांना सर्व देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तसेच ग्रंथालयसारखी मोठी चळवळही सुरु केली जाणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

शिक्षणावर तरतूद जास्त होती ती आणखी वाढवण्यात आली आहे. तर एकलव्य शाळा असतात त्यामध्ये एकच शिक्षक असतो तो दुर्गम भागात जाऊन शिकवतो त्याची नोंदही आजच्या अर्थसंकल्पमध्ये घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

शहरांचा विकास होण्यासाठी आणि तो योग्य प्रकारे करण्यासाठी महानगरपालिका पुढील काळात स्वतः चे पैसे स्वतः उभे करू शकते ही योजना आखण्यात आली आहे.

त्याच बरोबर वाढत्या बेरोजगारीसाठी स्पेशल पॅकेज देऊन तरुणांना स्वयंभू रोजगार करता येणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी यावेळी दिली आहे.

या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. त्याच प्रमणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. त्यांच्या टीकेबद्दल बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, ज्यांना फक्त राजकारण दिसते त्यांना काय बोलणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.