आम्ही स्वप्नातही पाहिलं नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, शिंदे गटाकडून हल्लाबोल

आम्ही कधी स्वप्नातही पाहिले नव्हतं की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील. भविष्य पाहून अथवा राशिभविष्य पाहून काहीही होत नाही. एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्री होतील हेही कोणी पाहिले नव्हते.

आम्ही स्वप्नातही पाहिलं नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, शिंदे गटाकडून हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 8:58 PM

मुंबईः शिंदे गटाकडून कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीचा दौरा करण्यात आला. त्यावेळी ठाकरे गटाकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या दौऱ्यामध्ये शिंदे गटाला कामाख्या देवीच्या दर्शनावरून लक्ष्य केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भविष्य सांगणाऱ्याला आपला हात दाखवल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनीही जोरदार निशाणा साधला.

स्वतःच भविष्य माहिती नसणारे लोकांचं भविष्य काय घडविणार अशा शब्दात त्यांचा समाचार घेतला. त्यामुळे आता नाराज झालेल्या शिंदे गटानेही त्यांच्यावर पलटवार करत अनेक मंत्री आणि आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

यावरून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील.

त्यामुळे आमचा भविष्यावर काही विश्वास नाही पण लोकशाहीवर विश्वास असल्याचे सांगत. लोकशाहीमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच निशाणा त्यांच्यावर साधण्यात आला.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी भविष्य बघितल्यावरून जरी त्यांच्यावर टीका करण्यात आली तरी, माझा त्यावर विश्वास नाही. पण या लोकशाहीवर विश्वास आहे. कर्मामध्ये आणि धर्मामध्ये ज्या लिहिलेल्या असतात त्या सत्य असतात.

त्यामुळे आम्ही कधी स्वप्नातही पाहिले नव्हतं की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील. भविष्य पाहून अथवा राशिभविष्य पाहून काहीही होत नाही. एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्री होतील हेही कोणी पाहिले नव्हते.

त्यामुळे या लोकशाहीत माणूस काहीही होऊ शकतो. आणि आपल्या देशाचा तसा इतिहास आहे. त्यामुळे भविष्यावर आणि राशिभविष्यावर आपला विश्वास नसल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यामुळे त्यांनाही ही संधी या लोकशाहीने दिली आहे. तशीच संधी एकनाथ शिंदेंना यांनाही मिळाली असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

शिंदे-ठाकरे गटाच्या एकमेकांवर जोरदार हल्लाबोल होत असून आता कामाख्या देवीच्या दर्शनानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघणार असल्याचे दिसून येत आहे.

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.