35 वर्षांखालील तरुणांचेही कोरोना लसीकरण करा, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. (Jitendra Awhad Demand Youth Corona Vaccinate)

35 वर्षांखालील तरुणांचेही कोरोना लसीकरण करा, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 10:58 AM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांच्या कोरोना लसीकरणाची ताबडतोब व्यवस्था करा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. भारत हा तरुणांचा देश ओळखला जातो. त्यामुळे 18 ते 35 या वयातील तरुण पिढीचे कोरोना लसीकरण करा, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. (Jitendra Awhad Demand Vaccinate corona for youth to CM Uddhav Thackeray)

तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करा

जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे अशी आपली ओळख आहे. या कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसतं आहेत. त्यामुळे 18 ते 35 वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून लवकरच घोषणा

त्याशिवाय पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे., असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले.मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो कि, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी, असेही त्यांनी ट्वीट करत सांगितले.

मुंबई, पुण्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद

राज्यात गेल्या 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रात (3 एप्रिल) एकाच दिवशी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे 73 लाख 47 हजार 429 जणांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले आहे. यात पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.

यात पुणे जिल्हा हा सर्वाधिक लस देणारा जिल्हा ठरला आहे. पुण्यात राज्यात सर्वाधिक 76 हजार 594 जणांना कोरोना लस लस देण्यात आली. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (46 हजार 937), नागपूर (41 हजार 556), ठाणे (33हजार 490) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात दिवसाला 6 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येत आहे. सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे काल महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.(Jitendra Awhad Demand Vaccinate corona for youth to CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 4000 बेड शिल्लक, आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहण्याचं आवाहन

कोरोनाला थोपवण्यासाठी मुंबईचे ‘मिशन लसीकरण’, रविवारीसुद्धा लोकांना लस मिळणार

Corona Vaccine | पुण्यात कोरोना लसीकरणाचा उच्चांक, महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.