मुंबई : “जिथे भाजप सत्तेत आहे तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे. आमचा कारभार पारदर्शक आहे. भाजपसारखे आकडे लपवण्याचे काम आम्ही करत नाही”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. “पहिल्या दिवसापासून कोरोना रुग्णांची नोंद केंद्र सरकारच्या नियमानुसार पारदर्शकपणे करण्यात आली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य एकमेव आहे जिथे मृतांच्या आकड्यांची नोंद पारदर्शकपणे झाले”, असंही ते म्हणाले (Minister Nawab Malik allegations that BJP hides death figures).
“आम्ही कुठलेही आकडे लपवलेले नाही. जी परिस्थिती आहे ती जनतेसमोर ठेवली आहे. दरदिवशी 70 हजार केसेस येत असताना राज्यात हॉस्पिटलमध्ये जागा नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही, अशा बातम्या आल्या नाहीत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्र आणि मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झाले आहे”, असं नवाब मलिक म्हणाले (Minister Nawab Malik allegations that BJP hides death figures).
“देशात 4 लाख लोकांच्या मृत्यूचा आकडा दिसत आहे. परंतु पत्रकार आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून हा आकडा दहापट म्हणजे 40 लाखांच्या घरात जात आहे. ही वस्तुस्थिती आहे”, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
“एकट्या उत्तर प्रदेशमध्ये 5 ते 6 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींचे मृतदेह अक्षरशः नदीत प्रवाहीत करण्यात आले. तर काही ठिकाणी नदीकिनारी भगव्या वस्त्राच्या कफनात लपटलेले मृतदेह पडलेले पहायला मिळाले. गुजरातमध्ये आणि बिहारमध्येही मृतांचे आकडे लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. भाजपला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही महाराष्ट्रात भाजपसारखे मृतांचे आकडे लपवले नाहीत”, असं नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा : ‘मुख्यमंत्र्यांकडून कोकणाला 252 कोटींची मदत जाहीर, दुसरीकडे केंद्राच्या पथकाने जेवणावर ताव मारला’