AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या कार्यक्रमात उष्माघाताने 13 जणांचा बळी गेला तो दुपारीच का ठेवला? मंत्री उदय सामंत यांनी आतली बातमी सांगितली

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी आलेल्या 13 श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय. याशिवाय अनेक श्रीसेवकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी आयोजित केला असता तर ही दुर्घटना टळली असती, अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे. असं असताना हा कार्यक्रम संध्याकाळी का आयोजित केला नाही, याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलीय.

ज्या कार्यक्रमात उष्माघाताने 13 जणांचा बळी गेला तो दुपारीच का ठेवला? मंत्री उदय सामंत यांनी आतली बातमी सांगितली
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 5:06 PM

मुंबई : नवी मुंबईतील खारघरमध्ये रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला गालबोट लावणारी घटना समोर आलीय. या कार्यक्रमात उपस्थिती लावणाऱ्या अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा फटका बसला आहे. अनेक श्रीसेवकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 13 श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात येतेय. असं असताना मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाचं आयोजन कसं करण्यात आलं होतं, नेमक्या काय-काय सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली, याबाबत माहिती दिली.

“या कार्यक्रमासाठी 600 मदतनीस होते. 150 नर्स होत्या. 73 रुग्णवाहिका होत्या. त्यातील 94 साध्या आणि 19 कार्डिअॅक होत्या. अमरायीमध्ये 4 हजार बेड्सचं हॉस्पिटल तयार केलेलं होतं. एमआयजी, कामोठे, आपोलो, टाटा हॉस्पिटल या ठिकाणी देखील बेड राखीव ठेवण्यात आले होते. वैद्यकीय बूथ ठेवण्यात आले होते. तिथे अधिकारी आणि डॉक्टर नेमले होते. रेल्वे स्टेशनवरुन यायला आणि जायला जवळपास 1050 बसेसची व्यवस्था ठेवली होती. बीएमसी, टीएमसी, नवी मुंबई महापालिका, पननेल महापालिका, मीरा भाईंदर महापालिका होत्या. पार्किंगसाठी 21 ठिकाणी व्यवस्था केलेली होती”, अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

“प्रशासनाकडून श्रीसेवकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्या दोन दिवसात वातावरण बदललं, तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. आप्पासाहेबांना बघता यावं यासाठी अनेक श्रीसेवक 14 तारखेपासून यायला सुरुवात झाली होती. ते ज्या श्रद्धेने आणि आस्थेने आले होते ते पाहता त्यांना थांबवणं आणि रोखणं बरोबर नव्हतं. सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं. वैद्यकीय सुविधांमध्ये ब्लड बँकपासून प्राथमिक उपचारांसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

कार्यक्रम दुपारी का ठेवला?

यावेळी उदय सामंत यांना कार्यक्रमाची वेळ दुपार ऐवजी संध्याकाळी का ठेवली नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही सामंत यांनी भूमिका मांडली. “हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यायचा होता. मात्र सर्वांना कार्यक्रम संपवून प्रत्येकाला घरी परतात आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम दुपारी ठेवला”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

20 ते 22 लाख श्रीसेवकांचा कार्यक्रमात सहभाग

“कालचा प्रकार दुर्देवी आहे. श्रीसदस्य ज्या संख्येने जमले होते त्यांना पाण्यापासून वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय श्रीसदस्यांबरोबरच घेण्यात आला होता. पण दुर्देवाने जी घटना घडली ती उष्माघातामुळे घडली आहे. कार्यक्रम एवढा मोठा होता की, 20 ते 22 लाख श्रीसदस्य या कार्यक्रमात सामील झाले होते. प्रशासनाने कुठेही हुकूमशाही वकरुन राबवलेला नव्हता. तर श्रीसदस्यांसोबत चर्चा करुन हा कार्यक्रम केला होता. पण दुर्देवाने यामध्ये सुद्धा राजकारण करणारे राजकारणी महाराष्ट्रात आहे हे आमचं सगळ्यांचं दुर्देवं आहे. या दुर्घटनेचं समर्थन कुणी करु शकत नाही”, असं सामंत म्हणाले.

सामंत यांचा विरोधकांना सल्ला

“सरकारवर टीका करण्यात काही लोकं मग्न आहेत. मला त्यांना विनंती वजा सूचना करायची आहे की, ठीक आहे, बाकीच्या वेळी रोज सकाळी साडेनऊ वाजता खोके, गद्दार, असं ऐकतो. पण जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने शुद्ध आणि पारदर्शकपणाने आयोजित केला होता, आप्पासाहेबांसारखे सामाजिक क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या माणसाला हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना बघण्यासाठी लाखो लोक आली. त्यांच्यासोबत अशा पद्धतीची सरकारच्या बाहेर राहून भूमिका घेणं मला योग्य वाटत नाही. अशा प्रसंगामध्ये सगळ्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. पण कुठल्याही प्रंसगाचं राजकीय भांडवल करायचं, कुठलाही प्रसंग घडल्यानंतर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, यातून बाहेर येऊन मोठ्या मनाने सगळ्या कालच्या कार्यक्रमाचा विचार करणे गरजेचं आहे. एक कलमी टीका करणं यापेक्षा या बद्दलची अजून काही सूचना असतील तर त्या सूचना सरकारला देण्यात काही प्रोब्लेम नाही”, असं सामंत विरोधकांना उद्देशून म्हणाले.

“प्रशासन आणि श्रीसदस्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार वेळा घेतला होता. कार्यक्रमाच्या आधीच्या दिवशी ते पहाटे तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मैदानात होते. पालकमंत्री या नात्याने मी स्वत: पाच दिवस तिथे उपस्थित होतो. मी सकाळ-संध्याकाळ आढावा बैठक घ्यायचो. शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण यांनी एक आढावा बैठक घेतली. तसेच मुख्य सचिवांनी एक आढावा बैठक घेतली होती. पण कालची घटना ही दुर्देवी आहे”, असं सामंत म्हणाले.

कार्यक्रमासाठी 13 कोटी रुपये खर्च?

“मृतकांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकार 5 लाखांची मदत करणार आहे. जखमींचा खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे. फक्त एकच विनंती या कार्यक्रमाचं राजकीय भांडवल कुणी करु नये. अशा दुर्घटनेच्या आडून राजकीय वातावरण निर्माण करु नका. तर महाराष्ट्राची संस्कृती जपून एकत्र येऊन काम करुयात”, असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं. तसेच कार्यक्रमासाठी 13 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या विषयी प्रश्न विचारला असता “खर्च किती झाला हे सगळं आम्ही प्रशासनामार्फत जाहीर करु. ते मैदान 380 एकरचं होतं. तिथे सुविधा देणं, जागा सपाटीकरण करणं, या सगळ्याला जो खर्च आलाय त्याबाबत माहिती दिली जाईल. पण प्रत्येक गोष्टीत शंका आणि संभ्रम निर्माण करणं चुकीचं आहे”, असं स्पष्टीकरण सामंत यांनी दिलं.

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.