मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत विचारा, मग टीका करा, उदय सामंतांचं भाजपला उत्तर

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, त्या घ्याव्याच लागतील असा निर्णय दिल्यानंतर, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत विचारा, मग टीका करा, उदय सामंतांचं भाजपला उत्तर
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 2:20 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, त्या घ्याव्याच लागतील असा निर्णय दिल्यानंतर, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मत विचारावं, त्यानंतर टीका करावी. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युवा सेनेवर टीका केली जाते, असं म्हणत उदय सामंत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. (Uday Samant on Supreme court decision)

राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिज्ञापत्रात आम्ही या परिस्थितीत परीक्षा घेऊ शकत नाही असं कळवले होते. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा निर्णय घेण्याबाबत ऐच्छिक मुभा द्यावी अशी मागणी केली होती. मात्र तसे करता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, असं उदय सामंत म्हणाले.

परीक्षा न घेण्याचा निर्णय विद्यार्थी आणि पालक यांचा विचार करुन घेतला होता. याबाबत आरोप -प्रत्यारोप करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करुन यातून मार्ग काढावा लागेल. निर्णयाचा आदर सर्वांनाच करावा लागेल, असं उदय सामंत यांनी नमूद केलं.

राज्यात प्रत्येक विद्यापीठात जाऊन मी कुलगुरुंशी चर्चा करणार आहे. उपाय-योजनांबाबत चर्चा करणार आहे. महाराष्ट्रभर विद्यापीठांचा दौरा करणार असल्याची माहिती यावेळी सामंत यांनी दिली.

साडे आठ लाख विद्यार्थ्यांच्या भावितव्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि जीवनाचा प्रश्न महत्वाचा आहे. परीक्षा न घेण्याबाबत मत असलेल्या इतर राज्यांशी चर्चा करण्याआधी राज्याचे महाधिवक्ता आणि न्याय व विधी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करु, असं सामंत म्हणाले.

ट्विटच्या माध्यमातून जे टीकाटिप्पणी करत आहेत, त्यांनी भान ठेवावं. 30 सप्टेंबरच्या डेडलाईनबाबत बंधन नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन याबाबत राज्याची भूमिका UGC समोर मांडेन. मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मत विचारावं, त्यानंतर टीका करावी. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युवा सेनेवर टीका केली जाते, असं म्हणत उदय सामंत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या 

UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, तारखा निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.