Aaditya Thackeray | ‘महाशक्ती सोबत आहे, मग…’ आदित्य यांचा सिनेट निवडणुकीवरुन मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Aaditya Thackeray | "राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Aaditya Thackeray | 'महाशक्ती सोबत आहे, मग...' आदित्य यांचा सिनेट निवडणुकीवरुन मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
aaditya thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 1:06 PM

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीलाही स्थगिती देण्यात आली आहे. त्यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली आहे. “2010 मध्ये युवा सेना सिनेटची निवडणूक लढली. 10 पैकी 8 जागांवर जिंकलो. 2017 मध्ये 10 पैकी 10 जागा जिंकल्या. 100 टक्के रिझल्ट होता. आमच्यासमोर सगळेच पक्ष लढत होते, तरीही आम्ही चांगल्या मताधिक्क्याने विजय मिळवला” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मागच्यावर्षी सिनेटची निवडणूक झाली नाही, यावर्षी निवडणूक अपेक्षित होती. मतदार नोंदणी झालेली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला. मी टीएन शेषन यांच पुस्तक वाचत होतो, त्यांनी त्यावेळी कुठल्या परिस्थितीत निवडणुका घेतल्या. आम्ही अन्य पक्ष निवडणूक लढवत होतो, काल स्थगिती आल्यानंतर सर्वांना प्रश्न पडलाय, नक्की असं काय घडलं?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलाय.

‘मणिपूरमध्ये जी परिस्थिती आहे, तसं वातावरण इथे नाहीय, मग तुम्ही….’

“कुठे गडबड गोंधळ झालाय? मणिपूरमध्ये जी परिस्थिती आहे, तसं वातावरण इथे नाहीय. आम्ही कुठलीही मारामारी, वादविवाद न करता निवडणूक लढवत होतो. मग निवडणूक रद्द का केली केली” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

स्थगित केलेली निवडणूक पुन्हा कधी होणार?

“सव्वा लाख मतदारांनी नोंदणी केली होती. हे सर्व पदवीधर होते. मग असं काय झालं, निवडणूक का स्थगित केली? पत्रकात म्हटलय बैठकीत ठरल्यानुसार निवडणूक स्थगित केली. ही बैठक किती वाजता, कुठे झाली? बैठकीचे मेरीट्स काय आहेत? सर्व अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत. स्थगित केलेली निवडणूक पुन्हा कधी होणार? सव्वालाख वोटर्सची 20 रुपये देऊन नोंदणी केली होती. प्रत्येक मतदाराची छाननी केली गेली. जे खोटे मतदार होते. ते कमी करुन 95 हजारावर मतदार यादी आली” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“सगळं पकडलं जाईल म्हणून झाकायला त्यांनी उडी मारली”

सिनेट निवडणूक स्थगित केली, त्यामागे एक कारण असं असू शकतं की, “राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती. सगळं पकडलं जाईल म्हणून झाकायला त्यांनी उडी मारली. त्यांचा दबाव होता का? ते निवडणुकीला घाबरतात का?” ‘निवडणूक घेऊ शकत नसेल, तर काय उपयोग?’

“विद्यापीठ निवडणुकीला सामोरे जायला घाबरत असतील, तर समजायच काय? एवढी फोडाफोड केली. दोन पक्ष फोडले, परिवार फोडला. महाशक्ती स्थापन केलीय. स्वत: मुख्यमंत्री, दोन भारदस्त उपमुख्यमंत्री सोबतीला. ही महाशक्ती सोबत असून मुंबई विद्यापीठामध्ये मिंधे गट-भाजपा सरकार निवडणूक घेऊ शकत नसेल, तर काय उपयोग?” अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.