Ajit pawar : शिंदे गटातील आमदारांना निधी मिळणार की नाही? भर सभेत अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं
शिंदे गटात नाराजी असल्याचं विरोधी पक्षाकडून बोललं जात होतं. मात्र अजित पवार यांनी एमईटीमधील सभेत बोलताना याबाबत जाहीरपणे सांगितलं आहे.
मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर दादांकडे परत एकदा अर्थखातं देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याचं विरोधी पक्षाकडून बोललं जात होतं. मात्र अजित पवार यांनी एमईटीमधील सभेत बोलताना याबाबत जाहीरपणे सांगितलं आहे.
शिंदेंच्या आमदारांना निधी देण्याबाबत पवार काय म्हणाले?
सगळे बसलेले आमदार काही आज उपस्थित राहून राहू शकत नाही. काही दवाखान्यात आहे काही येऊ शकले नाही काही तिकडच्या मिटींगला गेलेत असे सगळे आमदार आज पण माझ्या सगळ्या संपर्कात आहे. मी आमदारांना विचारा कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मी कधीही भेदभाव केला नाही, उद्याच्या काळामध्ये या सगळ्यांची काम करताना मी भेदभाव करणार नाही आणि त्यामध्ये भाजप आणि जे शिवसेना शिंदेगट त्याही आमदारांना मला सांगायचं माझी प्रतिमा महाराष्ट्र मध्ये एक दबंग देता एक कडक नेता स्वतःला पाहिजे तेच करतो असा नेता अशी झालेली आहे. मी तसं होऊ देणार नसल्याचं अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितलं.
माझे मुस्लीम बांंधव असतील, माझे आदिवासी असतील, माझे मागास्वर्गीय असतील, माझ्या महिला असतील, माझे तरुण असतील, मला दिसत नाही की बेरोजगारी वाढली महागाई वाढली, आपल्याला कमी करायची बेरोजगारी करायची आहे. उद्योग धंद्याला पोषक अशा प्रकारचे वातावरण करायचं आहे. मात्र विरोधामध्ये बसून ते वातावरण होऊ शकत नाही. सत्तेमध्ये बसून प्रश्न सोडवता येऊ शकत असतील तर का सोडवायचे नाहीत, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, 2019 च्या सत्ता सत्तास्थापनेवेळी काय घडामोडी घडल्या होत्या? त्यावेळचा सर्व घटनाक्रम अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितला. यामधून एक दिसून आलं की अजित पवार यांनी बोलताना शरद पवार मोक्याच्या वेळी कशा भूमिका बदलल्या याबद्दल सर्व सांगितलं.