मुंबईत मालाडमध्ये झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरुवात; अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामसााठी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले असून त्यांनी या कारवाईला विरोध सुरू केला आहे. (atul bhatkhalkar)

मुंबईत मालाडमध्ये झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरुवात; अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात
atul bhatkhalkar
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 9:54 AM

मुंबई: मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामसााठी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले असून त्यांनी या कारवाईला विरोध सुरू केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. (mmrda start action against kurar slum, bjp leader atul bhatkhalkar detained)

मालाड कुरार येथे एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री 12 वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांच्या लवाजम्यासह ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून या तोडक कारवाईला विरोध केला आहे. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या कारवाईची माहिती मिळताच आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाईला विरोध केला. त्यामुळे अतुल भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

आमचं आंदोलन सुरूच राहील

एमएमआरडीएच्या प्रकल्पासाठी कोणतीही नोटीस न देता घरं तोडण्यात येत आहेत. त्याला आम्ही विरोध केला होता. काल रात्री 12 वाजता नोटिसा देऊन आज सकाळी 9च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं. पोलिसी दंडुका दाखवत एकाला एका, तर दुसऱ्याला दुसऱ्या ठिकाणी ताब्यात घेऊन मोगलाई पद्धतीने आमच्यावर कारवाई करण्यात आली. पण आमचा लढा सुरू राहील. हे बांधकाम आम्ही होऊ देणार नाही. आम्हाला योग्य घरं मिळाली पाहिजे. झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन झालंच पाहिजे, असं भातखळकर यांनी सांगितलं.

कोर्टात धाव घेणार

आम्ही आंदोलन करणारच. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. असं असतानाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. याच्याविरोधात आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असं त्यांनी सांगितलं. (mmrda start action against kurar slum, bjp leader atul bhatkhalkar detained)

संबंधित बातम्या:

रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यास 8 वर्षांपूर्वी भाजपचा होकार, महापौर पेडणेकरांनी पाठिंब्याचं लेटरच दाखवलं!

राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात

शिवसेनेचे महेश कोठे आणि एमआयएमचे तौफिक शेख यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबला; वाचा कारण काय?

(mmrda start action against kurar slum, bjp leader atul bhatkhalkar detained)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.