AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, मनसेचा आरोप

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांचे बिल आणि शासकीय शुल्कामध्ये तफावत असून रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे (MNS alleges robbery of patients from private hospitals in Navi Mumbai).

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, मनसेचा आरोप
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 11:04 PM

रायगड : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारी खाजगी रुग्णालये रुग्णांना लुटत असल्याचा ठपका ठेवून मनसेने याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अक्षय काशीद यांनी मनसेच्या इतर कार्यकर्त्यांसह पनवेल महापालिकेच्या रायगड उपजिल्हाधिकारी दीपा भोसले यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून निवेदन दिलं आहे (MNS alleges robbery of patients from private hospitals in Navi Mumbai).

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेने खासगी रुग्णालयांची यादीदेखील जाहीर केली आहे. महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रात या रुग्णालयांमध्ये शासनाने निश्चित केलेल्या शुल्कामध्ये उपचार केले जातील, असं नमूद केलं आहे. मात्र, या रुग्णालयांच्या बिलांमध्ये आणि शासकीय शुल्कामध्ये बरीच तफावत असून रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

प्रशासनाकडे याबाबत वारंवार तोंडी, लेखी पाठपुरावा करुनही आजपर्यंत कोणत्याही हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही. यासंदर्भात पनवेल पालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे अनेकवेळा तक्रार करुनदेखील कोणतीही कारवाई झाली नाही, अशी खंत जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण यांनी व्यक्त केली (MNS alleges robbery of patients from private hospitals in Navi Mumbai).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कोरोनावर उपचार करताना लागणारे पीपीई किट आणि सॅनिटाईजचे पैसे प्रत्येक रुग्णाकडून न घेता, इतर रुग्णांमध्ये विभागून घ्यावे, असे शासनाचे आदेश असूनही प्रत्येक रुग्णाला वेगवेगळे चार्जेस आकारले जातात”, असा आरोप तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ यांनी केला.

“महाराष्ट्र सरकारने 31 मे 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या नियमांचं पालन शुल्क आकारताना खाजगी हॉस्पिटल प्रशासनाकडून केले जात नाही. खाजगी हॉस्पिटलचे व्यवस्थापन अशा जैविक संकटातदेखील रुग्णांच्या उपचादरम्यान लूट करुन आपली थडगी भरण्याचा प्रयत्न करत आहेत. वैद्यकीय क्षेत्राचा कॉर्पोरेट बिझनेस करणाऱ्या हॉस्पिटल मॅनेजमेंटवर आपण कडक कारवाई करावी, जेणेकरुन भविष्यात इतर रुग्णालये अशाप्रकारे कोरोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणार नाहीत”, असं मत योगेश चिले यांनी व्यक्त केलं.

“रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य वाढण्याच्यादृष्टीने प्रशासनाने केलेली कारवाई हीच सन्मानपत्र ठरेल. जर अशा हॉस्पिटलची पुराव्यानिशी तक्रार करुनही कारवाई केली नाही तर मनसैनिक तांडव करतील”, असा इशारा खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांनी दिला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.