अमोल मिटकरी अमेय खोपकर यांची शाब्दिक चकमक फटकेबाजी ते फाडण्यापर्यंत पोहोचली, दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरुच

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज (Chh.Shivaji Maharaj) यांची जयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार यासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत.

अमोल मिटकरी अमेय खोपकर यांची शाब्दिक चकमक फटकेबाजी ते फाडण्यापर्यंत पोहोचली, दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरुच
अमोल मिटकरी अमेय खोपकर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 9:33 AM

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज (Chh.Shivaji Maharaj) यांची जयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार यासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत. राज्य सरकारच्यावतीनं 19 फेब्रुवारी 1630 ही जन्मतारिख निश्चित करण्यात आली आहे. राज्यात 19 फेब्रवारी आणि तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यात येते. तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी करणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली होती.“तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे”, असंही मिटकरी म्हणाले होते. यानंतर मनसेचे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर (Ameya Khokpkar) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे. अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, असं म्हटलंय. तर, अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करुन खोपकर यांना प्रत्युत्तर दिलंय.

अमेय खोपकर काय म्हणाले

मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, असं ट्विटद्वारे म्हटलंय.

खोपकर यांचं ट्विट

अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर

अमेय खोपकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके द्यायला हवं,असं म्हटलं. याला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही”, अशा शब्दात अमेय खोपकर यांचं नाव न घेता मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मिटकरींचं ट्विट

वाद कसा सुरु झाला?

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवजयंती तारखेनुसार साजरी व्हावी, असं म्हटलंय. “तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे”, असंही मिटकरी म्हणालेत. तर, “मिटकरी फालतू राजकारण करू नका. तुम्हाला नेहमीच फालतू राजकारण करायची सवय आहे. प्रसिद्धीसाठी काहीही बडबड करता. अक्कल आहे का तुम्हाला? कुठल्या गोष्टीचे राजकारण करता, याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला.” असे अमेय खोपकर यांनी म्हंटले. यावरून परत, “तुमची अक्कल किती आहे, हे मला माहिती आहे” असा पलटवार मिटकरी यांनी केला. तसेच, शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणून दाखवा, असे आवाहनही दिले. त्यावर, तुमच्या सांगण्यावरुन मी का म्हणू? अशा शब्दात खोपकर यांनी मिटकरींना प्रत्युत्तर दिलं होतं.

इतर बातम्या:

कंगना रणौत, नारायण राणे यांच्यानंतर मोहित कंबोज BMC च्या निशाण्यावर, पालिकेला अतिरिक्त बांधकामाचा संशय

Special Report : शिवजयंतीवरुन अमेय खोपकर आणि अमोल मिटकरींमध्ये शाब्दिक चकमक!

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.