सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा ‘तो’ नेता कोण; राज ठाकरेंचा थेट सवाल

सचिन वाझे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. | Raj Thackeray Sachin Vaze

सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा 'तो' नेता कोण; राज ठाकरेंचा थेट सवाल
ही चौकशी खरंच नीटपणे पार पडली तर अक्षरश: फटाक्याची माळ लागेल.
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 12:21 PM

मुंबई: ख्वाजा युनूस प्रकरणात 17 वर्षे निलंबित असलेल्या सचिन वाझे (Sachin Vaze) यांना शिवसेनेत कोणी आणलं, त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी नेणारी ती व्यक्ती कोण होती, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला. भाजप आणि शिवसेनेचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याची विनंती केली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. याचा अर्थ सचिन वाझे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (MNS Raj Thackeray on Sachin Vaze)

ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण कल्पनेपेक्षा अधिक धक्कादायक असल्याचा दावा केला. त्यासाठी हे प्रकरण फक्त सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यापुरते मर्यादित राहता कामा नये. हा विषय दुसरीकडे भरकटता कामा नये. त्यासाठी केंद्र सरकारने याप्रकरणात हस्तक्षेप करुन त्याची कसून चौकशी करावी. ही चौकशी खरंच नीटपणे पार पडली तर अक्षरश: फटाक्याची माळ लागेल. या सगळ्यात कोण कोण आत जाईल, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. या सगळ्यात अनेक धक्कादायक चेहरे समोर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

‘उद्धव ठाकरे आणि अंबानींचे मधूर संबंध, मग पोलीस खंडणी कशाला वसूल करतील?’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मधूर संबंध सर्वश्रूत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला अंबानी व्यासपीठावर उपस्थित होते. मग असे असताना पोलीस अंबानी यांच्याकडे पैसे मागायची हिंमत कशी करू शकतील? अंबानी यांच्या घराखाली कोणाला सांगितल्याशिवाय एखादा पोलीस अधिकारी बॉम्ब कसा ठेवेल? कोणाच्या सूचना असल्याशिवाय पोलीस असं धाडस करणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

‘अंबानींच्या सुरक्षेत इस्रायली लोकं, मध्य प्रदेशचे पोलीस’

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त असतो. या सुरक्षाकड्यात इस्रायली लोकांचाही समावेश आहे. याशिवाय, मध्य प्रदेशचे पोलीसही अंबानी यांच्या दिमतीला आहेत. ते याठिकाणी का आहेत, हे कोडे अद्याप मला उलगडलेले नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. संबंधित बातम्या:

वाझे हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा, केंद्राने चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल : राज ठाकरे

परमबीर सिंगची बदली का केली, चौकशी का केली नाही? राज ठाकरेंचा सवाल

सचिन वाझेंचा मुक्काम ‘वर्षा’वर होता, नारायण राणेंचा गौप्यस्फोट!

(MNS Raj Thackeray on Sachin Vaze)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.