AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही’, मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे पुन्हा आक्रमक

"माझ्या महाराष्ट्रातील सर्व मनसैनिकांनो अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही. जिथे भोंगे जोरात चालू असतील, पहिली पायरी पोलिसांत तक्रार करायची", अशी सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

'अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही', मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे पुन्हा आक्रमक
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 8:42 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन इशारा दिलाय. “मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी झाला नाही तर आधी पोलिसांत जा. पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर मशिदींसमोर मोठ्या ट्रकमध्ये मोठे स्पिकरवर हनुमान चालीसा लावा”, असं राज ठाकरे म्हणाले. ते नेस्को सेंटर येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात संबोधित करत होते.

“इतके वर्ष चालू असलेला, इतके वर्ष बोलत असलेला, बाळासाहेब ठाकरेंनी किती वेळा याबाद्दल उल्लेख केला, पण उल्लेख केल्यानंतर ती यंत्रणा खालून राबवावी देखील लागते. तिच गोष्ट जी आजपर्यंत बाळासाहेब बोलत आले की मशिदींवरील भोंगे उतरवले पाहिजेत. मनापासून त्यांची ती इच्छा होती. ती आपण पूर्ण केली. त्याचं कारण आपण भोंगे काढा सांगितले नाही. नाही काढले तर हनुमान चालीसा लाऊ”, असं राज ठाकरे म्हणाले.

“या गोष्टीसाठी आपण पुढे निघालो, पण तरीही माझ्या महाराष्ट्रातील सर्व मनसैनिकांनो अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही. जिथे भोंगे जोरात चालू असतील, पहिली पायरी पोलिसांत तक्रार करायची. पोलिसांनी कारवाई केली नाही तर पोलिसांवर कोर्टाचा अवमान केल्याची केस दाखल होऊ शकते. न्यायालयाच्या अपमान केल्याची केस पोलिसांवर होऊ शकते. त्यामुळे पहिल्यांदा पोलिसांना सांगा”, असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“पोलिसांकडून काही झालं नाही तर मोठ्या ट्रकवरती मोठे स्पिकर घेऊन हनुमान चालीसा त्यांच्यासमोर वाजवा. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. जोपर्यंत आरेला कारे होत नाही, तोपर्यंत हे असंच राहणार. माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडून मला अपेक्षा आहे की समोरून आरे आलं तर कारे म्हटलंच गेलं पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी केली राज्यपालांची नक्कल

“महाराष्ट्रातली उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत. त्यावर आमचं धोतर बोललं नाही का? कोश्यारी…(राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नक्कल). वय काय, बोलतोय काय, काय चाललंय? राज्यपाल पदावर बसलायत म्हणून मान राखतोय. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही”, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

“राज्यपाल महिन्याभरापूर्वी काय म्हणाले? म्हणे, इथले गुजराती आणि मारवाडी परत गेले तर काय होईल? कोश्यारी जी पहिल्यांदा त्या गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारा की तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुम्ही उद्योगपती आहात ना, व्यापारी आहात ना? मग आपल्या क्षेत्रात का उद्योगधंदे नाही थाटलेत?”, असे सवाल राज ठाकरेंनी केले.

“याचं कारण असं की उद्योगधंदे थाटण्यासाठी महाराष्ट्रासाठी सुपीक जमीन नव्हती. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा. महाराष्ट्र मोठाच होता आणि आहे. देश नव्हता तेव्हा या भागाला हिंद प्रांत म्हणत”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचीही नक्कल

“काल-परवा मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्रीपदावर असताना बघितलं, तब्येतीचं कारण सांगून (उद्धव ठाकरेंची नक्कल), एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी,आता फिरताहेत सगळीकडे”, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

“त्यांच्यासारखा वागणाऱ्यातला मी नव्हे. स्वत:च्या स्वार्थासाठी आणि पैशांसाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि मागे कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

“ही लोकं करणार काहीच नाही, मराठीच्या मुद्द्यावर असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल, उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? त्याचं कारण कधीच भूमिका घेतली नाही. भूमिका घ्यायचीच नाहीय. फक्त पैशांसाठी, स्वार्थासाठी कधी हा तर कधी तो. पण बस मला सत्तेत बसवा”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री.
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला.
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.