AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर मराठी माणसालाच विका, ‘आपलं ठाणे, मराठी ठाणे’, मनसेचे पोस्टर्स

“जर कोणाला घर विकायचं असेल तर मराठी माणसालाच घर विका असे होर्डिंग (MNS hoardings in Thane) मनसेने ठाण्यात लावले आहेत.

घर मराठी माणसालाच विका, 'आपलं ठाणे, मराठी ठाणे’, मनसेचे पोस्टर्स
| Updated on: Sep 19, 2019 | 11:51 AM
Share

ठाणे : ठाण्यातील मराठी विरुद्ध गुजराती वादानंतर मनसेने  (MNS hoardings in Thane) आक्रमक पवित्रा घेतला आहे. “जर कोणाला घर विकायचं असेल तर मराठी माणसालाच घर विका असे होर्डिंग (MNS hoardings in Thane) मनसेने ठाण्यात लावले आहेत. ‘आपलं ठाणे, मराठी ठाणे’, असं लिहून “आपलं घर-मालमत्ता मराठी माणसालाच विका”!, लढा ठाण्याच्या मराठी माणसाचा असा आशय या होर्डिंगवर आहे.

मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) आणि मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panase) यांची नावं या पोस्टर्सवर आहेत.

ठाण्यात मराठी माणसांना घर भाड्यानेही मिळणं कठीण झालं आहे. काही दिवसापूर्वीच एका सोसायटीत मराठी आणि गुजराती कुटुंबामध्ये वादावादी झाली होती. राहुल पैठणकर आणि हसमुख शहा या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी हसमुख शहा यांनी राहुल पैठणकर यांना या सोसायटीत राहण्याची तुमची लायकी नाही असं म्हणत अवहेलना केली होती. इतकंच नाही तर शहा पिता-पुत्रांनी राहुल पैठणकर यांना बेदम मारहाणही केली होती. या सर्वप्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हसमुख शहा यांना कान धरुन माफी मागायला लावली होती.

नौपाड्यातील विष्णूनगर हा मराठी भाषिक परिसर आहे. येथील सुयश सोसायटीत पाचव्या मजल्यावर राहुल पैठणकर हे मराठी भाषिक आणि सहाव्या मजल्यावर हसमुख शाह हे गुजराथी भाषिक कुटुंबासह वास्तव्य करतात. 11 सप्टेंबर रोजी राहुल यांच्या आईची चप्पल लिफ्टमध्ये अडकल्याने लिफ्ट अडकली होती. तेव्हा,वरच्या मजल्यावरील शहा कुटुंबीयांनी याबाबतची विचारपूस राहुल यांच्याशी केली असता, दोन्ही कुटुंबात वाद झाले. या वादाचे पर्यवसान भांडण आणि शिवीगाळीत होऊन दोन्ही कुटुंबाकडून एकमेकास हाणामारी करण्यापर्यंत मजल गेली. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची उणीदुणी काढली.

तथापि,शहा पिता-पुत्रांनी राहुल यांना मारहाण केल्याची सीसीटीव्ही चित्रफीत सोशल मीडियात व्हायरल करून काही जणांनी या वादाला मराठी विरुद्ध गुजराथी भाषिक वादाची फोडणी दिली. या व्हायरल चित्रफितीमुळे ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले. दोन्ही कुटुंबातील हा वाद नौपाडा पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनीही दोघांच्या तक्रारी नोंदवून घेत दोन्ही कुटुंबाना नोटीस बजावली असून या वादावर पडला आहे. तरीही,सोशल मीडियात व्हायरल झालेल्या चित्रणाने पोलिसांच्या डोक्याचा ताप नाहक वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी शहा यांचा शोध घेत त्यांना मनसे स्टाईलने माफी मागण्यास भाग पाडले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला व्हिडिओ समोर कोणाला शिवीगाळ आणि मारहाण करू नये असे आदेश दिल्याने मी याला कॅमेरासमोर आता माफी मागायला सांगितली आहे मात्र त्याला नंतर मनसे स्टाईलने चोप देणार असल्याचा व्हिडीओ तयार करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.