“या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत असेल तर आम्ही काय करणार”; सुषमा अंधारे यांच्यावर बोलताना या नेत्याची जीभ घसरली
प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सुषमा अंधारे मागील काही वर्षे त्या हिंदू धर्मावर टीका करत होत्या. त्यावेळी त्यांनी संत एकनाथ महाराज यांच्यावर टीका केली होती.
मुंबईः ज्या शिवसेनेसाठी प्रबोधन यात्रा काढण्यात आली त्या यात्रेत सुषमा अंधारे यांच्याकडून भाषण देण्यात येऊ लागले. मात्र सुषमा अंधारे जशी शिवसेनेत आली, तसं शिवसेनेच्या उजेडातल्या बायका अंधारात गेल्या अशी टीका मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करण्यात आली. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधार यांच्यावर टीका करताना शिवसेनेतील जुन्या माणसांवर कसा अन्याय झाला आहे.
ते सांगताना सुषमा अंधारे यांच्यामुळे शिवसेनेतील जुन्या नेत्यांवर अन्याय झाल्याची टीकाही त्यांनी सांगितले. ज्या 85 वर्षांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे यांनी कोणत्याही मर्यादा पाळल्या नव्हत्या.
त्यांच्यावर टीका करताना त्यांना त्या म्हाताऱ्या हा शब्द त्यांनी उच्चारला होता अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली होती. त्याच सुषमा अंधारे यांचे आता भाषण जुन्या शिवसैनिकांना ऐकावे लागत आहे अशी खोचक टीकाही त्यानी त्यांच्यावर केली.
प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सुषमा अंधारे मागील काही वर्षे त्या हिंदू धर्मावर टीका करत होत्या. त्यावेळी त्यांनी संत एकनाथ महाराज यांच्यावर टीका केली होती.
त्याचवेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्यावरही टीका केली होती. त्यांटीका करताना त्यांनी ज्या ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून शब्द वधवून घेतले होते, त्या रेड्याबद्दल बोलताना म्हणाले की, या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत असले तर आम्ही काय करणार असं म्हणत असाताना त्यांनी त्यांचा उल्लेख म्हैस असा केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रकाश महाजन आणि सुषमा अंधारे यांचा वाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.
मनसेच्या ज्येष्ठ नेत्याने सुषमा अंधारे यांच्यावर टीका करत असताना जीभ घसरली असल्याने प्रकाश महाजन यांच्यावर टीका होऊ लागली याहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रकाश महाजन आणि सुषमा अंधारे यांचा वाद वाढण्याची शंका व्यक्त केली जात आहे.