” कंपाऊंडर” डोक्यावर पडलेत का???” सामनातील मथळ्यावरुन संदीप देशपांडेंची खोचक टीका
लसकर-ए-कोरोना शिर्षकावरुन संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. (Sandeep Deshpande Sanjay Raut)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी कोरोना लसीकरणाबाबात सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवरुन शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे. दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा फोटो शेअर करत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सामनामध्ये कोरोना लसीकरणाच्या बातमीला लसकर-ए-कोरोना असं शिर्षक देण्यात आलं आहे. संदीप देशपांडेंनी यावर निशाणा साधला आहे. (MNS leader Sandeep Deshpande criticize Sanjay Raut on Headline Samana)
संदीप देशपांडे काय म्हणाले
“करोनाच्या लशीची तुलना लष्कर ए तोयबा बरोबर ?? ” कंपौंडर” डोक्यावर पडलेत का???” असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. देशपांडे यांनी सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा फोटो देखील शेअर केला आहे. कोरोनाच्या लसीची तुलना लष्कर-ए-तोयबा बरोबर कशी केली जाऊ शकते, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही देशपांडेंनी निशाणा साधला आहे.
करोना च्या लशीची तुलना लष्कर ए तोयबा बरोबर ?? ” कंपौंडर” डोक्यावर पडलेत का??? pic.twitter.com/ICshB7hAss
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 17, 2021
सामनाच्या बातमीत काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तर, महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील लसीकरणाबाबतची बातमी सामनामध्ये प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचं शिर्षक लसकर-ए-कोरोना असं देण्यात आले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लसकर-ए-कोरोनाचा संदर्भ घेत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. कोरोनाला हरवायचे या निर्धारानं उतरलेल्या कोरोना योद्ध्यांना लस आल्यामुळं सुरक्षा कवच मिळाले असून आता आरपारची लढाई सुरु झाल्याचंही सामनाच्या बातमी म्हटलं गेलं आहे.
औरंगाबादच्या नामकरणासाठी मनसे आक्रमक
औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यात यावे, या मागणी साठी मनसे कार्यकर्त्यांनी विरारमध्ये आज आंदोलन केले आहे. विरार पश्चिम बस स्थानकातून औरंगाबादला जाणाऱ्या बसला छत्रपती संभाजी नगर असे स्टिकर लावून हे आंदोलन करण्यात आले आहे. आज (17 जानेवारी) सकाळी 7 वाजून 15 मिनिटाला सुटणाऱ्या विरार औरंगाबाद या बसला छत्रपती संभाजी नगर असे स्टिकर लावून, बस समोर उभा राहून, घोषणा देत औरंगाबादच्या नामकरणाची मागणी केली आहे. नामकरण करण्याच्या मागणीचे निवेदन ही मनसे कार्यकर्त्यांनी बस चालकाकडे सुपूर्द केले आहे.
संबंधित बातम्या:
Sandeep Deshpande | …तोपर्यंत औरंगाबादचं नामांतर अशक्य, संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर निशाणा
पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू; मनसेचा थेट इशारा
(MNS leader Sandeep Deshpande criticize Sanjay Raut on Headline Samana)