Sandeep Deshpande Video : महिला पोलीसांचा मान राखता आला नाही? देशपांडेंना ताब्यात घेताना हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलीस पडल्या

Sandeep Deshpande Video : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रक काढून आंदोलनावर ठाम असल्याचं जाहीर केलं होतं.

Sandeep Deshpande Video : महिला पोलीसांचा मान राखता आला नाही? देशपांडेंना ताब्यात घेताना हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलीस पडल्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 12:24 PM

मुंबई: मुंबईत मनसेच्या (mns) आंदोलनावेळी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दादरमध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसेचे कार्यकर्ते जमले होते. मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यामुळे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असतानाच या धावपळीत एक महिला पोलीस (mumbai police) पडली. तर पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशपांडे यांनी तिथून पळ काढला. त्यामुळे त्यांना पोलीस ताब्यात घेऊ शकले नाही. मात्र, पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. आजच्या आंदोलनाविषयी ते बोलणार आहेत. या शिवाय ते आणखी काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रक काढून आंदोलनावर ठाम असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर राज्यातील काही भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पण संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन दिसलं नाही. अनेक ठिकाणी मुस्लिमांनी भोंग्याशिवाय पहाटेची नमाज अदा केल्याने मनसेच्या आंदोलनातील हवाच निघून गेली. मुंबईत दादरमध्ये संदीप देशापांडे यांच्या नेतृत्वात भोंग्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. बघता बघता मनसेचे कार्यकर्त्यांची संख्या वाढली. त्यानंतर घोषणाबाजी सुरू झाल्या. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. मनसे कार्यकर्त्यांनी अचानक आक्रमक आंदोलन सुरू केलं. यावेळी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. ही धरपकड सुरू असतानाच संदीप देशपांडे एका गाडीत बसले. ते गाडीत बसल्याने पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेले असता या धावपळीत एक महिला पोलीस खाली पडल्या. महिला पोलीस पडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना उचललं.

महिला पोलिसांच्या डोक्याला मार

या महिला पोलीस खाली पडल्या तेव्हा त्यांच्या डोक्याला मार लागल्याचं दिसून येतं. त्या पडल्या तेव्हा डोक्याला हात लावून त्या कळवळल्या. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना उठवलं. मात्र, त्यांना किती मार लागला हे कळू शकलं नाही.

राज ठाकरे काय बोलणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या अनुषंगाने आणि पुढील आंदोलनाच्या बाबत ते काही घोषणा करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.