‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी केली आहे. ‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’ अशी खिल्ली उडवणारे पोस्टर्स मनसेने लावले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या पोस्टरचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. एकीकडे शिवसैनिक मोठ्या उत्साहात अयोध्येत पोहोचले असताना, दुसरीकडे मनसेने मुंबईत अशी पोस्टरबाजी करुन, […]

‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी केली आहे. ‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’ अशी खिल्ली उडवणारे पोस्टर्स मनसेने लावले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या पोस्टरचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. एकीकडे शिवसैनिक मोठ्या उत्साहात अयोध्येत पोहोचले असताना, दुसरीकडे मनसेने मुंबईत अशी पोस्टरबाजी करुन, शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो, असं शिवसेना नेते नेहमी म्हणत असतात. त्या पार्श्वभूमीवर मनसेने पोस्टरद्वारे टोलेबाजी केली.  यापूर्वीही मनसेने अनेकवेळा शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी केली होती. त्याला शिवसेनेनेही पोस्टरद्वारे उत्तर दिलं होतं.

“अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरुर बांधा, पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बांधा” असे पोस्टर्सही मनसेने यापूर्वी लावले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रातून राजकीय फटाकेबाजी करत आहे, तर कार्यकर्ते पोस्टरबाजीतून टीका करत आहेत. आता यावर शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  दसरा मेळाव्यात ‘चलो अयोध्या’चा नारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्येत पोहोचतील. सध्या अयोध्येत मोठ्या प्रमाणात पोलीस बंधेबस्त तैनात करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

अयोध्या LIVE: उद्धव ठाकरे सहकुटुंब जाणार, राम मंदिरासाठी चांदीची वीट देणार   

व्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार  

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.