मोठी बातमी : लस घेतलेल्यांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची परवानगी द्या : मनसे

पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले होते. (MNS Demand To Allow travel by local)

मोठी बातमी : लस घेतलेल्यांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची परवानगी द्या : मनसे
corona vaccine mumbai local
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 9:20 AM

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. (MNS Sandeep Deshpande Demand To Allow Citizens travel by Mumbai local who have completed corona vaccination)

संदीप देशपांडेंचे ट्वीट 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटनुसार, महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग चक्रीवादळाला लाजवणारा – मनसे

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र, विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या या धावत्या भेटीवर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले होते.

मुंबई लोकलवर निर्बंध कायम

मुंबई लोकल बंद असल्यामुळे कोरोनाचे (Mumbai corona) रुग्ण कमी झाले आहेत. मुंबई लोकलवर (Mumbai Local) काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागणार आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं होतं. राज्यातील 14 जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा, असंही विजय वडेट्टीवारांनी नमूद केलं होतं.

महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन 

महाराष्ट्र सरकारने येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतात काही रुग्ण आढळत आहे. त्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. (MNS Sandeep Deshpande Demand To Allow Citizens travel by Mumbai local who have completed corona vaccination)

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग चक्रीवादळाला लाजवणारा, उद्धव ठाकरे खरंच बेस्ट सीएम : मनसे

मुंबई लोकलवर निर्बंध आवश्यक, 14 जिल्हे रेड झोनमध्ये, कडक लॉकडाऊन गरजेचा : विजय वडेट्टीवार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.