AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलिसांना 100 कोटींचं टार्गेट तर महापालिकेचा आकडा किती असेल; मनसेचा सवाल

हीच ती वेळ वीरप्पन गँगला कायमचं क्वारंटाईन करण्याची, असेही संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. | MNS Parambir singh letter bomb

मुंबई पोलिसांना 100 कोटींचं टार्गेट तर महापालिकेचा आकडा किती असेल; मनसेचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Mar 21, 2021 | 10:04 AM
Share

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन शिवसेनेच्या कारभारावर आगपाखड केली आहे. (MNS take a dig at Thackeray govt over Parambir singh letter bomb)

मुंबई पोलिसांना 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट सरकारने दिले होते. मग मुंबई महानगरपालिकेला किती पैसे वसूल करण्याचं टार्गेट असेल , असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. हीच ती वेळ वीरप्पन गँगला कायमचं क्वारंटाईन करण्याची, असेही संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तत्पूर्वी राज ठाकरे यांनीही शनिवारी ट्विट करुन परमबीर सिंह यांच्या पत्राविषयी चिंता व्यक्त केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती.

सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत की नाही हे तपासावं, आत्मपरीक्षण करण्याची वेळ: संजय राऊत

सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेनेचे संकटमोचक संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी खुलेपणाने संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी अनेक परखड मतं मांडली. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो, स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या:

आयुक्तांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचं सूचक ट्विट

Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ची राज्य सरकारकडून शहानिशा होणार!

सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत की नाही हे तपासावं, आत्मपरीक्षण करण्याची वेळ: संजय राऊत

(MNS take a dig at Thackeray govt over Parambir singh letter bomb)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.