‘लॉकडाऊन’मध्ये रामदास आठवलेंनी तयार केला ‘हा’ खास पदार्थ

रामदास आठवले यांच्या शीघ्र चारोळ्या प्रसिद्ध आहेतच, मात्र त्या जोडीने त्यांना असलेली पाककलेची आवडही आता समोर आली आहे. (Ramdas Athawale Cooking during Lockdown)

'लॉकडाऊन'मध्ये रामदास आठवलेंनी तयार केला 'हा' खास पदार्थ
Follow us
| Updated on: Apr 03, 2020 | 4:34 PM

मुंबई : ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये अनेक जण घरी बसून आपले छंद जोपासताना दिसत आहेत. ‘गो कोरोना-कोरोना गो’ असा हटके मंत्र देणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही लॉकडाऊनच्या काळात पाककलेची हौस भागवली. (Ramdas Athawale Cooking during Lockdown)

रामदास आठवले यांच्या शीघ्र चारोळ्या प्रसिद्ध आहेतच. मात्र त्या जोडीने त्यांना असलेली पाककलेची आवडही आता समोर आली आहे. राजकीय नेत्यांपासून कलाकार, खेळाडू मोकळ्या वेळेत आपण काय करतो, याचे व्हिडिओ पोस्ट करताना दिसतात. आता आठवलेंनीही ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत आपण केलेल्या आम्लेटविषयी सांगितलं.

‘कोरोना विरुद्ध लढा यशस्वी करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये घरीच राहा. आवडत्या छंदाला वेळ द्या. आज मी घरी आम्लेट तयार केले. किचनमध्ये अनेक वर्षांनी वेळ दिला.’ असं रामदास आठवलेंनी लिहिलं आहे. व्हिडिओमध्ये आठवलेंच्या पत्नी सीमा आठवले आणि मुलगाही दिसत आहे.

(Ramdas Athawale Cooking during Lockdown)

गो कोरोना, कोरोना गो

‘गो कोरोना, कोरोना गो’ अशा घोषणा देतानाचा रामदास आठवलेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे एका प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थनासभेचा हा व्हिडिओ होता. या सभेला उपस्थित असलेले आठवले आपल्या खास शैलीत ‘गो करोना’च्या घोषणा देत होते.

‘गो कोरोना, कोरोना गो, गो गो कोरोना, कोरोना गो’ असा जयघोष त्यांनी आपल्या खुमासदार कवितांच्या शैलीतच केला होता. या व्हिडिओवर सोशल मीडियातून विनोदाचा पाऊस पडला होता.

मग काय कम कोरोना म्हणू?

‘कोरोना गो’ म्हणायचं नाही तर काय ‘कम कोरोना’ म्हणायचं का?, असा सवाल आठवले यांनी टीकाकारांना विचारला होता. ‘कोरोना कम’ असं मी म्हणणार नाही, ‘कोरोना गो’ असंच म्हणेन, ‘कोरोना गो’ म्हणजे कोरोना इथून जा, देशावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे, हा त्यामागचा उद्देश होता, असं रामदास आठवले यांनी चहू बाजूच्या टीकेनंतर स्पष्ट केलं होतं.

मी दिलेल्या घोषणांवरुन माझ्यावर टीका केली जात असली तरी ती निरर्थक आहे. उत्तर म्हणून मी कोणावरही टीका करणार नाही, असेही आठवले म्हणाले होते. (Ramdas Athawale Cooking during Lockdown)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.